MS Dhoni : धोनीनं शाहरुख आणि अमिताभ यांना मागे टाकलं, सर्वात श्रीमंतांच्या 'या' खास क्लबमध्ये केली एन्ट्री, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनीनं शाहरुख आणि अमिताभ यांना मागे टाकलं, सर्वात श्रीमंतांच्या 'या' खास क्लबमध्ये केली एन्ट्री, पाहा

MS Dhoni : धोनीनं शाहरुख आणि अमिताभ यांना मागे टाकलं, सर्वात श्रीमंतांच्या 'या' खास क्लबमध्ये केली एन्ट्री, पाहा

Dec 09, 2024 10:16 PM IST

MS Dhoni Net Worth Brand Endorsements : धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण तरीही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसतो. क्रिकेट सोडले तरी मार्केटमध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली नाही.

MS Dhoni : धोनीनं शाहरुख आणि अमिताभ यांना मागे टाकलं, सर्वात श्रीमंतांच्या 'या' खास क्लबमध्ये केली एन्ट्री, पाहा
MS Dhoni : धोनीनं शाहरुख आणि अमिताभ यांना मागे टाकलं, सर्वात श्रीमंतांच्या 'या' खास क्लबमध्ये केली एन्ट्री, पाहा

MS Dhoni Net Worth : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या पुढे गेला आहे. खरं तर, आतापर्यंत अमिताभ हे सर्वात जास्त ब्रँड्सशी करार करणारे भारतीय सेलिब्रेटी होते. अमिताभ यांना ४१ ब्रँड्स स्पॉन्सर करतात आणि शाहरुख ३४ ब्रँडशी संबंधित आहे.

पण आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी या दोघांच्याही पुढे गेला आहे कारण आता धोनीला ४२ ब्रँड्स स्पॉन्सर करतात. आपल्या कर्णधारपदाखाली भारताला T20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीची एकूण संपत्ती १०४० कोटी रुपये आहे.

धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण तरीही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसतो. क्रिकेट सोडले तरी मार्केटमध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली नाही. TAM मीडिया रिसर्चच्या रिपोर्टनुसार, धोनीने या सर्व ४२ ब्रँड्ससोबत करार केले आहेत आणि अलीकडेच 'युरोग्रिप टायर्स' नावाच्या कंपनीशी भागीदारीही केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी एका डीलसाठी ५-१० कोटी रुपये घेतो.

धोनीचा उत्पन्नाचा स्रोत

एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असून आयपीएल २०२४ मध्ये त्याला फक्त ४ कोटी रुपये पगार मिळणार आहे. त्याला CSK ने अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले. Pepsi, Reebok आणि GoDaddy सारख्या जगप्रसिद्ध कंपन्या त्याला स्पॉन्सर करतात.

सेव्हन स्पोर्ट्स, गरुड स्पोर्ट्स आणि खाताबुकसह अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये त्याने पैसे गुंतवले आहेत. तो 'स्पोर्ट्सफिट' नावाची जिम चालवतो, ज्याच्या अनेक शहरांमध्ये शाखा आहेत आणि रांचीमध्ये 'माही रेसिडेन्सी' नावाचे हॉटेल देखील आहे. त्याची एकूण संपत्ती १,०४० कोटी रुपये आहे. ज्यामुळे तो केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक बनतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या