भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारा रोहित शर्मा हा तिसरा कर्णधार आहे. भारताला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव हे पहिले कर्णधार ठरले. त्यानंतर एमएस धोनीने टीम इंडियाला वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली.
यानंतर मेन इन ब्लू वर्ल्ड कप जिंकणारा रोहित शर्मा तिसरा कर्णधार ठरला. या दरम्यान, टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याला विचारण्यात आले की रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील सर्वोत्तम कर्णधार कोण?
यानंतर धोनी आणि रोहित शर्माच्या कर्णधारपदावरील प्रश्नावर शिवम दुबे खूपच गोंधळलेला दिसला. अलीकडेच रोहित शर्मा आणि शिवम दुबे यांच्यासह टीम इंडियाचे काही स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पोहोचले होते. या शोचा होस्ट कपिल शर्माने भारतीय अष्टपैलू खेळाडूला कर्णधारपदाबाबत हा प्रश्न विचारला.
शिवम दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो, जिथे तो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे आणि टीम इंडियासाठी तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
कपिलने शिवम दुबे याला विचारले, "शिवम, तू दोन संघांसाठी खेळतोस. तू धोनीसोबत खेळतोस आणि तू रोहितसोबतही खेळतोस. तुला कोणता कर्णधार जास्त आवडतो?" हा प्रश्न ऐकून रोहित शर्मा म्हणतो, 'फसला.'
त्यानंतर सूर्यकुमार यादव कपिल शर्माला म्हणतो, "तू खूप अवघड प्रश्न विचारला आहेस."
यानंतर शिवमने धोनी आणि रोहितच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, "मला असे वाटते की मी ज्याच्यासोबत खेळत आहे, तो कर्णधार त्यावेळी सर्वोत्तम असतो. मग मी चेन्नईकडून खेळताना धोनी आणि टीम इंडियाकडून खेळताना धोनी माझ्यासाठी सर्वोत्तम असतात."
यावर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत शिवम विजयी टीम इंडियाचा भाग होता. शिवमने स्पर्धेतील सर्व सामने खेळले. आता हळूहळू तो T20 मध्ये संघाचा मुख्य खेळाडू बनत आहे.