MS Dhoni on toughest bowler : महेंद्रसिंग धोनी याने आपल्या कारकिर्दीत मोठ-मोठ्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्समध्ये माहीची गणना केली जाते, परंतु कोणत्या गोलंदाजाने माजी भारतीय कर्णधाराला सर्वात जास्त त्रास दिला? माही कोणत्या गोलंदाजाला सर्वात धोकादायक मानतो? हे तुम्हाला माहीत आहे का?
वास्तविक, माही मास्टरकार्ड इंडियाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होती. यावेळी त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी धोनीला विचारण्यात आले, की कोणत्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करणे त्याला सर्वात कठीण गेले? या प्रश्नाला उत्तर देताना माहीने दोन गोलंदाजांची नावे घेतली.
माहीने वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांचे सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून वर्णन केले. माहीच्या मते, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांच्याविरुद्ध फलंदाजी करणे खूप कठीण आहे.
वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहेत. आतापर्यंत सुनील नरेन याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १७६ सामन्यात १८० विकेट घेतल्या आहेत. सुनीर नरेन याला सर्वकालीन महान फिरकीपटूच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरुण चक्रवर्तीने आयपीएलच्या ७१ सामन्यांमध्ये ८३ फलंदाजांना बाद केले आहे.
अलीकडेच वरुण चक्रवर्ती याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली होती. या स्पर्धेत भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत ४ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त १८ टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने ४.७५ च्या इकॉनॉमी आणि १९ च्या सरासरीने १० विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने ७.२ इकॉनॉमी आणि १४.६ च्या सरासरीने ३३ फलंदाजांना बाद केले आहे. याशिवाय त्याने आयपीएलच्या ७१ सामन्यांमध्ये ८३ विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या