चेन्नई सुपर किंग्सचा विकेटकीपर फलंदाज एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणारकी नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. आयपीएलमधील सर्वच संघांना रिटेन खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करायची आहे. अशा स्थितीत धोनी आयपीएल २०२५ खेळणार की नाही, हे तेव्हाच स्पष्ट होऊ शकते.
पण धोनीने आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने सीएसके कॅम्पही चिंतेत आहे. बरं, पण याआधी धोनीचा एक नवा लूक समोर आला आहे, ज्यामध्ये तो पांढरा बनियान परिधान केलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये एमएस धोनीने पांढरा बनियान आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. तो व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना आहे. त्याच्या बायसेपचा आकार आणि त्याच्या खांद्याचा आकार स्पष्टपणे दाखवतो की 'थाला किती फिट आहे. याशिवाय, डार्क चष्मा घातलेला धोनीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा फोटो एखाद्या जाहिरातीच्या शुटिंगचा असू शकतो.
दरम्यान, धोनी आागामी आयपीएलमध्ये खेळणार की नाही, २८ ऑक्टोबरपर्यंत समोर येऊ शकते, असे सांगितले जात आहे. पण अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "धोनीने सीएसकेकडून खेळावे, अशी आमची इच्छा आहे, परंतु धोनीने या विषयावर आम्हाला काहीही स्पष्ट केले नाही. मी तुम्हाला ३१ ऑक्टोबरपूर्वी सर्व काही सांगेन."
धोनीने आधीच सीएसकेचे कर्णधारपद सोडले असून संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. त्याच वेळी, धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिेट करण्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. असे झाल्यास सीएसकेने धोनीला ४ कोटी रुपयांमध्ये सीएसके रिटेन करेल, गेल्या मोसमात धोनीला १२ कोटी रुपये मिळाले होते.