MS Dhoni : धोनीचा आयपीएल पगार कमी होणार? ‘या’ नियमामुळे होणार कोट्यवधींचं नुकसान-ms dhoni may be converted as uncapped player ipl 2025 mega auction will face salary deduct ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनीचा आयपीएल पगार कमी होणार? ‘या’ नियमामुळे होणार कोट्यवधींचं नुकसान

MS Dhoni : धोनीचा आयपीएल पगार कमी होणार? ‘या’ नियमामुळे होणार कोट्यवधींचं नुकसान

Aug 17, 2024 10:12 AM IST

एका वृत्तानुसार बीसीसीआय आपला एक जुना नियम परत आणू शकते. या नियमानुसार एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत ठेवले जाऊ शकते. यामुळे धोनी निश्चितपणे आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसणार असल्याचेही स्पष्ट होईल.

MS Dhoni : धोनीचा आयपीएल पगार कमी होणार? ‘या’ नियमामुळे होणार कोट्यवधींचं नुकसान
MS Dhoni : धोनीचा आयपीएल पगार कमी होणार? ‘या’ नियमामुळे होणार कोट्यवधींचं नुकसान (ANI)

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आयपीएल संघ मालकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडू घोषित करण्यावर चर्चा झाली.

पण त्यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या (SRH)मालक काव्या मारन यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. पण आता धोनीला अनकॅप्ड खेळाडू बनवण्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

धोनीचा पगार कमी होणार?

एका वृत्तानुसार बीसीसीआय आपला एक जुना नियम परत आणू शकते. या नियमानुसार एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत ठेवले जाऊ शकते. यामुळे धोनी निश्चितपणे आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसणार असल्याचेही स्पष्ट होईल.

हा नियम यापूर्वी देखील अस्तित्वात होता, परंतु तो तेव्हा वापरला गेला नाही. मात्र आता तो नियम परत आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. कॅप्ड खेळाडू असताना, धोनीला CSK कडून प्रत्येक मोसमात १२ कोटी रुपये मानधन मिळत होते, पण जर त्याला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत ठेवले तर त्याचा पगार ४ कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो.

अनकॅप्ड खेळाडू नियम काय आहे?

जर एखाद्या खेळाडूने निवृत्त होऊन ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, तर त्याला कॅप्ड खेळाडूपासून अनकॅप्ड खेळाडूमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. हा नियम इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनपासून २०२१ पर्यंत लागू होता, परंतु २०२२ मध्ये तो रद्द करण्यात आला कारण कोणत्याही संघाने त्याचा वापर केला नव्हता.

IPL २०२४ मध्ये हे स्पष्टपणे दिसले की धोनीला गुडघेदुखीची समस्या होती, तरीही तो संपूर्ण हंगाम खेळत राहिला. पण या दुखापतीमुळे तो अनेकदा सातव्या किंवा खालच्या फळीत फलंदाजी करताना दिसला.

या दुखापतीमुळे धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असे प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु अधिकृत दुजोरा न मिळाल्याने धोनीला खेळताना पाहण्याच्या चाहत्यांच्या आशा कायम राहिल्या आहेत.