काही दिवसांपूर्वीच भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाह राधिका मर्चंटसोबत झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाने बरीच चर्चा मिळवली होती. या लग्नाला बॉलिवूडपासून क्रिकेट जगतातील आणि जगभरातून बड्या चेहऱ्यांनी हजेरी लावली होती.
त्याच वेळी, आता राधिका मर्चंट हिचा वाढदिवसही मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. या बर्थडे पार्टीलादेखील भारतातील लोकप्रिय चेहऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. धोनीसह अनेक प्रसिद्ध चेहरे या पार्टीत दिसले. राधिका मर्चंटच्या बर्खडे पार्टीतील महेंद्रसिंग धोनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये धोनी बॉलीवूड सेलिब्रेटी ओरीसोबत पोझ देताना दिसत आहे.
माहीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसचे, सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. धोनीशिवाय राधिका मर्चंटच्या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलिवूड जगतातील अनेक प्रसिद्ध चेहरे आले होते.
धोनीने कर्णधार म्हणून १९९ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या दरम्यान भारतीय संघाने ११० सामने जिंकले आहेत तर ७४ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. त्याच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ही ५५.२७ इतकी आहे.
तसेच, धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये भारताने २७ विजय तर १८ पराभव पत्करले आहेत. कसोटीतील विजयाची टक्केवारी ही ४५ टक्के राहिली आहे.
तर धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार पद भुषवले आहे. यात भारताने ४१ विजय मिळवले आहेत तर २८ वेळा संघ पराभूत झाला आहे. टी-२० मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ही ५९.२८ इतकी आहे.