Video : 'गुलाबी शरारा' गाण्यावर धोनीचे ठुमके; डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : 'गुलाबी शरारा' गाण्यावर धोनीचे ठुमके; डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : 'गुलाबी शरारा' गाण्यावर धोनीचे ठुमके; डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Dec 03, 2024 06:02 PM IST

MS Dhoni Dance Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ४३ वर्षीय धोनी 'गुलाबी शरारा' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

एमएस धोनी
एमएस धोनी (BCCI)

Viral Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पहाडी गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. ४३ वर्षीय माहीचा हा खास अंदाज पाहून तुम्हीही हरखून जाल.

व्हायरल झालेला व्हिडिओ एखाद्या पार्टीतील असावा असं दिसत आहे. काही स्त्री-पुरुष धोनीच्या हातात हात गुंफून पहाडी गाण्याच्या तालावर नाचत आहेत. धोनी देखील त्यांना साथ देत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. धोनी हा तसा गंभीर आणि सौम्य स्वभावाचा समजला जातो. त्यामुळं त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूष झाले आहेत.

एका युजरनं कमेंट केली की, 'कॅप्टन कूल पहाडी गाण्यावर आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्स दाखवत आहे. धोनी मैदानात असो किंवा डान्स फ्लोअरवर, तो जिंकून टाकतो. 

आणखी एकानं लिहिलंय की, प्रत्येकाला जसा आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो, त्याच पद्धतीनं तो हा आनंद घेतोय. तो खेळला, जिंकला आणि आता आपल्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवतोय. ही गोष्ट प्रत्येक सामान्य भारतीयाला हवीहवीशी वाटते. धोनी त्या लाखो लोकांची स्वप्नं जगत आहे. नशीबवान माणूस आहे.'

आणखी एकानं गमतीनं म्हटलंय की, धोनी हा क्रिकेटच्या मैदानात आणि इतरत्रही आजवर इतका गंभीरपणे वावरलाय की आता त्याला असं नाचताना पाहून विश्वास बसत नाही.'

धोनी मूळचा झारखंडी नाही?

धोनीचा जन्म रांचीमध्ये झाला असला तरी त्याचं मूळ उत्तराखंडचं आहे. त्याचं कुटुंब मूळचं उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील आहे. ज्या पद्धतीनं धोनी पहाडी गाण्यांवर रमलेला दिसत आहे, त्यातून तो आपलं मूळ अजूनही विसरला नाही हेच दिसतंय.

२०२५ च्या आयपीएलमध्येही दिसणार

धोनीनं २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. धोनी आयपीएल २०२५ मध्येही खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जनं त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयांना रिटेन केलं आहे. धोनीनं आयपीएल २०२४ च्या आधी सीएसकेचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडं सोपवलं. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघानं पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या