जेव्हा दोन सुपरस्टार एकत्र येतात, तेव्हा काय होते? त्यांना पाहून चाहते वेडे होतात. होय ना! आता साऊथच्या आगामी GOAT या चित्रपटातही असेच काहीसे घडले आहे. GOAT या चित्रपटात तामिळ सुपरस्टार थलपथी विजय मुख्य भुमिकेत आहे.
विजय हा खूप मोठा स्टार आहे. त्याची पडद्यावरची उपस्थिती चाहत्यांना वेड लावते. या चित्रपटात त्याच्यासोबत आणखी एक सुपरस्टार दिसणार आहे, मात्र हा सुपरस्टार चित्रपट जगतातील नसून क्रिकेट जगतातील आहे. त्याचे नावे महेंद्रसिंह धोनी आहे.
भारताला दोनदा विश्वविजेता बनवणाऱ्या धोनीचे चेन्नईत प्रचंड चाहते आहेत. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली या संघाला ५ जेतेपदे मिळवून दिली आहेत. चेन्नईचे लोक धोनीला थाला म्हणतात.
GOAT चित्रपटात धोनीचा एक छोटासा कॅमिओ दाखवण्यात आला आहे. या कॅमिओमध्ये तो आयपीएलचा सामना खेळताना दिसत आहे आणि विजय हा सामना पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
धोनीचा स्क्रीन टाइम खूपच कमी आहे, परंतु त्याची उपस्थिती खूपच हायलाइट केली गेली आहे आणि चाहते त्याबद्दल खूप आनंदी आहेत. चाहते दोघांना एकत्र पाहून अक्षरश: वेडे झाले आहेत.
विजयसोबत या चित्रपटात प्रभू देवा, स्नेहा यांच्याही भूमिका आहेत. दरम्यान, धोनी चित्रपटाच्या फायनल कटचा भाग नसल्याचे व्यंकट प्रभू यांनी म्हटले आहे. मात्र, तो क्रिकेट सामन्याच्या दृश्यांमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात माजी भारतीय क्रिकेटर सुब्रमण्यम ब्रदीनाथ देखील दिसणार असून याद्वारे तो चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
धोनी हा क्रिकेट विश्वाचा बादशहा आहे. आता त्याने चित्रपटांच्या दुनियेतही उडी घेतली आहे. त्याचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. धोनी एंटरटेनमेंट लिमिटेड असे या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. या प्रोडक्शन हाऊसने एलजीएम नावाचा चित्रपटही तयार केला आहे.