मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनीला जवळच्या मित्रानेच लावला १५ कोटींचा चुना, रांचीमध्ये गुन्हा दाखल, प्रकरण काय? पाहा

MS Dhoni : धोनीला जवळच्या मित्रानेच लावला १५ कोटींचा चुना, रांचीमध्ये गुन्हा दाखल, प्रकरण काय? पाहा

Jan 05, 2024 04:05 PM IST

MS Dhoni Files Criminal Case in Ranchi :टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीसोबत फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. धोनीच्या जवळच्या मित्रांनीच त्याला १५ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मिहीर दिवाकर आणि सौम्या बिस्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ms dhoni
ms dhoni (PTI)

MS Dhoni latest News : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिह धोनीसोबत फसवणूक झाली आहे. धोनीने याप्रकरणी अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे, माहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र आहे आणि त्याचा बिझनेस पार्टनरही आहे. मिहीरने धोनीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिहिर दिवाकरने एम एस धोनीसोबत २०१७ मध्ये जगभरात क्रिकेट अकादमी सुरू कण्यासाठी करार केला होता. मात्र दिवाकर याने करारनाम्यात नमूद केलेल्या अटी पाळल्या नाहीत. करारानुसार, नफा दोघांमध्ये वाटून घ्यायचा होता, परंतु करारातील सर्व अटी व शर्ती पाळल्या गेल्या नाहीत.

धोनीचं १५ कोटींच नुकसान

यानंतर धोनीने १५ ऑगस्ट २०२१ रोजी अरका स्पोर्ट्सचे अथॉर‍िटी लेटर मागे घेतले. धोनीने त्यांना अनेक कायदेशीर नोटीस पाठवल्या, पण याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर आता धोनीच्या वकीलांनी दावा केला आहे की अरका स्पोर्ट्सने त्याची फसवणूक केली आहे. यामुळे धोनीचे १५ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे.

धोनी आयपीएल २०२४ दिसणार

दरम्यान, एम एस धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

धोनीच्या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली तर तो खूपच प्रभावी खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

IPL २००८ मध्ये धोनीचे पदार्पण काय होते. यामध्ये त्याने १६ सामने खेळले आणि ४१४ धावा केल्या. आयपीएलच्या पहिल्या मोसमात त्याने २ अर्धशतके झळकावली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४