अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत करत अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून पराभव झाल्यानंतर चार वर्षांनी ते पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत.
धोनीचे चाहते म्हणत आहेत, ट्रम्पच्या विजयात थालाचा हात
ऐतिहासिक अमेरिकन निवडणुकीवर जग प्रतिक्रिया देत असताना, भारतीय महान क्रिकेटपटू एमएस धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर "थाला फॉर ए रिझन" या ट्रेंडिंग वाक्याचा वर्षाव केला आहे. #USAElection2024 हॅशटॅगसोबत ट्रम्प आणि धोनीचा फोटो आहे, जो गेल्या वर्षी दोघांनी खेळलेल्या गोल्फ सामन्यादरम्यान घेण्यात आला होता. याचे कनेक्शन काय? तर धोनीची आयकॉनिक जर्सी नंबर ७.
एका चाहत्याने सोशल मीडियावर अमेरिकेच्या निवडणूक निकालाच्या दिवसाची तारीख म्हणजे ६-११-२०२४ धोनीच्या सातव्या क्रमांकाशी कशी जुळते याकडे लक्ष वेधले. "६+१+१+२+२+४ = १६. १+६=७," असं या चाहत्याने ट्रम्प आणि धोनीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे. दुसऱ्याने हाच फोटो शेअर करत लिहिले की, " फोर्टी ७ th वे राष्ट्राध्यक्ष-थाला फॉर रीझन." धोनीच्या चाहत्यांसाठी ७ हा आकडा केवळ एका आकड्यापेक्षा जास्त आहे; हा आकडा नेतृत्व, कौशल्य आणि यशाचे प्रतीक आहे. तमिळभाषेत 'थाला' म्हणजे 'नेता' हा शब्द धोनीचा क्रिकेटमधील उल्लेखनीय वारसा दर्शवण्यासाठी वापरला जातो.
एका दुर्मिळ क्षणी धोनीने आपल्या चाहत्यांचा पाठिंबा आणि आपल्या जर्सी नंबरशी इव्हेंट्स जोडण्याच्या त्यांच्या क्षमतेची कबुली दिली. एका कार्यक्रमात धोनी म्हणाला, “मला स्वत: या ट्रेंडची माहिती नव्हती, पण मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे. मला सोशल मीडियावर स्वतःचा बचाव करण्याची गरज नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ते माझ्यासाठी ते करतात. चाहते सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत,. या "थाला फॉर अ रिझन" पोस्टसारख्या अनोख्या पद्धतीने त्यांचे कौतुक व्यक्त करत आहेत.
फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर आयोजित रॅलीत ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करत राष्ट्रीय एकतेच्या गरजेवर भर दिला. ट्रम्प म्हणाले की, "तुमचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष आणि ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा असामान्य सन्मान मिळाल्याबद्दल मी अमेरिकन जनतेचे आभार मानू इच्छितो. गेल्या चार वर्षांतील विभागणी मागे टाकण्याची वेळ आली आहे. आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. या ऐतिहासिक विजयासह ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणातील पुढील अध्यायाची मुहूर्तमेढ रोवली असून पुढे काय घडते हे पाहण्यासाठी त्यांचे समर्थक उत्सुक आहेत.