महेंद्रसिंह धोनी याची गणना भारताच्या महान कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. यामुळे धोनीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. अशातच आता धोनीच्या एका कट्टर चाहत्याबाबत अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. धोनीच्या एका कट्टर चाहत्याने आत्महत्या केली आहे.
आत्महत्या केलेल्या या चाहत्याचे नाव गोपी कृष्णन असून तो तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील रहिवासी होता. गोपी कृष्णन (१८ जानेवारी) घरात मृतावस्थेत आढळला.
गोपी कृष्णन याचा शेजारील गावातील काही लोकांशी वाद सुरू होता, याला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. गोपीचा भाऊ आणि स्थानिक पोलिसांनीही याला दुजोरा दिला.
गोपी कृष्णनच्या भावाने दिलेल्या जबानीनुसार, त्याच्या भावाचा शेजारच्या गावातील काही लोकांशी पैशावरून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्याचे गोपीसोबत भांडणही झाले होते. या घटनेनंतर गोपी खूप अस्वस्थही झाला होता. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
गोपी कृष्णन हा धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचा मोठा चाहते होता. तो धोनीचा इतका कट्टर चाहता होता, की त्याने २०२० मध्ये आपले राहते घर पूर्णपणे पिवळ्या रंगात रंगवले होते. गोपीने आपल्या घराचे नावदेखील 'होम ऑफ धोनी फॅन' असे ठेवले होते. २०२० मध्ये, सीएसके फ्रेंचाइजीने या चाहत्याचा फोटो शेअर केला होता. कृष्णनच्या घराचा व्हिडिओ धोनीपर्यंतही पोहोचला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोनीने त्याचे कौतुक केले होते.
संबंधित बातम्या