असा चाहता पाहिलाय का? ५,३५० किमी सायकलिंग करून रांचीला पोहोचला, धोनीला भेटला आणि फार्म हाऊसही फिरला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  असा चाहता पाहिलाय का? ५,३५० किमी सायकलिंग करून रांचीला पोहोचला, धोनीला भेटला आणि फार्म हाऊसही फिरला

असा चाहता पाहिलाय का? ५,३५० किमी सायकलिंग करून रांचीला पोहोचला, धोनीला भेटला आणि फार्म हाऊसही फिरला

Published Oct 04, 2024 04:08 PM IST

MS Dhoni Fan Ride 5350 km Bicycle : एमएस धोनीच्या एका चाहत्याने धोनीला भेटण्यासाठी सायकलवरून ५३५० किलोमीटरचा प्रवास केला. त्याने स्वता: त्याचा प्रवास एका व्हिडीओतून सांगितला आहे.

MS Dhoni : असा चाहता पाहिलाय का? ५३५० किमी सायकलिंग करून रांचीला पोहोचला, धोनीला भेटला आणि फार्म हाऊसही फिरला
MS Dhoni : असा चाहता पाहिलाय का? ५३५० किमी सायकलिंग करून रांचीला पोहोचला, धोनीला भेटला आणि फार्म हाऊसही फिरला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जगभरात चाहते आहेत. त्याची क्रेझ आपण आयपीएलच्या वेळी स्टेडियमध्ये पाहिली आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात.

आता असाच एक जबरा चाहता समोर आला आहे, ज्याने धोनीला भेटण्यासाठी सायकलवरून ५३५० किलोमीटरचा प्रवास केला आहे. गौरव कुमार असे या चाहत्याचे नाव आहे.

रांचीला पोहोचल्याचा किस्सा त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये गौरवने धोनीला भेटण्यासाठी सायकलवरून एकूण ५३५० किमीचा प्रवास कसा केला ते सांगितले. एवढा लांबचा प्रवास करूनही धोनीला भेटण्यासाठी त्याला जवळपास आठवडाभर वाट पाहावी लागली.

व्हिडीओमध्ये गौरवने सांगितले की, तो प्रथम धोनीला भेटण्यासाठी दिल्लीहून चेन्नईला गेला होता, पण तेथे तो माहीला भेटू शकला नाही. यानंतर तो चेन्नईहून दिल्लीला परत आला आणि नंतर दिल्लीहून रांचीला गेला.

गौरवने हा संपूर्ण प्रवास सायकलवरून केला. त्याने सांगितले की, माहीला भेटण्यासाठी त्याने दिल्ली ते चेन्नई असा २१०० किलोमीटर सायकल चालवली.

त्यानंतर तेथून तो पुन्हा दिल्लीला आला. अशा प्रकारे त्याने ४२०० किलोमीटर सायकल चालवली. त्यानंतर गौरव दिल्लीहून रांचीला गेला, त्यासाठी त्याने सायकलवरून ११५० किलोमीटरचे अंतर कापले. अशाप्रकारे गौरवने धोनीला भेटण्यासाठी ५३५० किलोमीटरचे अंतर कापले.

रांचीला पोहोचल्यानंतरही गौरवला फार्महाऊसबाहेर जवळपास आठवडाभर तळ ठोकावा लागला. त्यानंतर आठवडाभराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला एमएस धोनीला भेटण्याची संधी मिळाली. पहिला आठवडा गौरवला फक्त धोनीची झलक पाहायला मिळाली. त्यानंतर आठवडाभराने त्याला धोनीला भेटण्याची संधी मिळाली.

दुसरा व्हिडिओ शेअर करताना गौरवने एमएस धोनीला भेटल्याची कहाणी सांगितली, तो म्हणाला की "मी खूप आनंदी आहे. माझे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी माही सरांना भेटलो. मी माही सरांच्या मोठ्या भावालाही भेटलो. त्यांनी मला संपूर्ण फार्म हाऊस फिरवले. सुरक्षेच्या कारणास्तव फोटो व्हिडिओ काढता आला नाही." यानंतर त्याने माहीची सही असलेला टी-शर्ट दाखवला."

Whats_app_banner

संबंधित बातम्या