भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनी याची प्रत्येक कृती त्याच्या लाखो चाहत्यांना वेड लावते. भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी करताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोबाबत असे बोलले जात आहे की, तो वीकेंडला त्याच्या काही निवडक आणि जुन्या मित्रांसह एका देसी ढाब्यावर पोहोचला आणि तिथे अतिशय देसी स्टाईलमध्ये क्वालिटी टाइम घालवला. फोटोमध्ये धोनीसह एकूण १४ लोक दिसत आहेत.
विशेष म्हणजे, धोनी त्याच्या क्रिकेट कामगिरीसोबतच देसी स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. जगातील सर्व संपत्ती आणि कीर्ती मिळवूनही तो खूप साधे जीवन जगतो, याची चर्चा नेहमीच होत असते. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्याने संपूर्ण लक्ष आपल्या कुटुंबावर केंद्रित केले आहे. कधी तो रांची शहराबाहेर अनेक एकरात पसरलेल्या त्याच्या फार्म हाऊसवर सेंद्रिय शेती करतो तर कधी तो आपल्या विदेशी कुत्र्यांना प्रशिक्षण देताना दिसतो. क्रिकेटमध्ये एवढं मोठं स्थान मिळवूनही तो त्याच्या मित्रांसाठी नेहमीच उपलब्ध असतो.
इतकंच नाही तर जेव्हाही कोणताही चाहता त्याचा ऑटोग्राफ मागतो तेव्हा तो त्यांना कधीच निराश करत नाही, या ढाबा ट्रिपदरम्यान त्याने एका लहान मुलासोबत सेल्फीही काढला. माही आता ४३ वर्षांचा असून, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग आहे. पण तो पुढील आयपीएल हंगामात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महेंद्रसिंह धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोबतच धोनीने ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
यानंतर २०११ चा एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी फॉर्मेटमध्ये नंबर-वन बनला. धोनीने वनडे, कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ४८७६, १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये माहीचा सर्वोत्तम स्कोअर २२४, १८३ आणि ५६ धावा आहे.
धोनीने IPL च्या २६४ सामन्यांमध्ये ३९.१३ च्या सरासरीने आणि १३७.५४ च्या स्ट्राईक रेटने ५२४३ धावा केल्या आहेत. या यष्टीरक्षक फलंदाजाची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणना केली जाते.