मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Anant Radhika Wedding : धोनीने आकाश अंबानीसोबत केला डान्स, ब्राव्हो आणि साक्षीनं दिली साथ, पाहा

Anant Radhika Wedding : धोनीने आकाश अंबानीसोबत केला डान्स, ब्राव्हो आणि साक्षीनं दिली साथ, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 02:01 PM IST

ms dhoni dance anant ambani pre wedding : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी जबरदस्त डान्स करताना दिसला. धोनी आकाश अंबानीसोबत दांडिया खेळताना दिसला.

ms dhoni dance, Anant Radhika Wedding
ms dhoni dance, Anant Radhika Wedding

anant ambani radhika marchant pre wedding : गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरू आहे. या तीन दिवसीय प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये जगभरातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. यात शनिवारी (२ मार्च) संध्याकाळच्या कार्यक्रमांचे काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आली आहेत.

यामध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी जबरदस्त डान्स करताना दिसला. धोनी आकाश अंबानीसोबत दांडिया खेळताना दिसला. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिग सोहळ्याला धोनीसोबत क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सही उपस्थित आहेत. धोनीच्या या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यानंतर धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा माजी सहकारी ड्वेन ब्रावोसोबतही डान्स केला. धोनीची पत्नी साक्षीनेही या डान्समध्ये सहभाग घेतला. यानंतर धोनी या सोहळ्यात सलमान खान, रणवीर सिंग यांसारख्या बॉलीवूड स्टार्सशी संवाद साधताना दिसला.

धोनी आयपीएलमध्ये दिसणार

धोनी आता आयपीएल २०२४ मध्ये क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. धोनीचे हे शेवटचे आयपीएल असू शकते. गेल्या मोसमात धोनी गुडघ्याच्या समस्येशी झुंजताना दिसला होता. मात्र, आता त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच धोनीने आयपीएलची तयारी खूप आधीच सुरू केली होती. आयपीएल २०२४ मध्ये सीएसकेचा पहिला सामना २२ मार्च रोजी चेपॉकच्या मैदानावर आरसीबीशी होणार आहे.

धोनीने आयपीएलमध्ये ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

WhatsApp channel