भारतासह जगभरातील विविध भागात गुरुवारी (३१ ऑक्टोबर) लोकांनी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. भारतात क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकारांसह इतर प्रसिद्ध चेहऱ्यांनी दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचवेळी, आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, माही दिवाळीनिमित्त त्याच्या घरी पूजा करत आहे. यावेळी कॅप्टन कूलसोबत कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत. धोनीचा लाल ड्रेसमधील लूक पाहण्यासारखा आहे. लाल ड्रेसमध्ये थाला खूपच देखणा दिसत आहे.
महेंद्रसिंह धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटरला पाहून चाहते खूप खूश आहेत. धोनी दिवाळी साजरी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनीला आयपीएल २०२५ सीझनसाठी रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा माजी कर्णधार अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिसा पाथिराना आणि शिवम दुबे यांना कायम ठेवले आहे.
रवींद्र जडेजा - १८ कोटी
ऋतुराज गायकवाड- १८ कोटी
मथिषा पाथिराना- १३ कोटी
शिवम दुबे - १२ कोटी
एम एस धोनी- ४ कोटी
चेन्नईने ५ खेळाडूंवर एकूण ६५ कोटी रुपये खर्च केले. म्हणजेच सीएसकेचा संघ ५५ कोटी रुपयांसह आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात प्रवेश करेल. आता मेगा लिलावात चेन्नई कोणत्या खेळाडूंवर बोली लावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आता संघाला मेगा लिलावात फक्त एकाच खेळाडूसाठी राईट टू मॅच वापरता येणार आहे.
मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल मिर्च, शार्दुल मिचेल, मिचेल सँटनर. , मुस्तफिजुर रहमान, रिचर्ड ग्लेसन, अवनीश राव अरावली, डेव्हन कॉनवे.