मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ऋतुराज आपला नवा कर्णधार असेल… धोनीने ब्रेकफास्ट टेबलवर केली घोषणा, नेमकं काय घडलं? वाचा

ऋतुराज आपला नवा कर्णधार असेल… धोनीने ब्रेकफास्ट टेबलवर केली घोषणा, नेमकं काय घडलं? वाचा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 22, 2024 10:39 AM IST

Chennai Super Kings, Ruturaj Gaikwad : आयपीएल २०२४ आधी CSK ने सर्वात मोठी घोषणा केली. महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड सीएसकेचा कर्णधार असणार आहे.

Chennai Super Kings Captain Ruturaj Gaikwad : ऋतुराज आपला नवा कर्णधार असेल… धोनीने ब्रेकफास्ट टेबलवर केली घोषणा, नेमकं काय घडलं? वाचा
Chennai Super Kings Captain Ruturaj Gaikwad : ऋतुराज आपला नवा कर्णधार असेल… धोनीने ब्रेकफास्ट टेबलवर केली घोषणा, नेमकं काय घडलं? वाचा (PTI)

Chennai Super Kings Captain Ruturaj Gaikwad : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) १७ वा मोसम आज शुक्रवारपासून (२२ मार्च) सुरू होत आहे. मात्र उद्धाटनाच्या सामन्यापूर्वीच स्पर्धेत एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. 

वास्तविक, या मोसमाच्या सलामीच्या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. आता ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज सोशल मीडियावर ही घोषणा केली.

गुरुवारी (२१ मार्च) चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजमेंटने सांगितले की, आता महेंद्रसिंह धोनी आमचा कर्णधार राहणार नाही. ऋतुराज गायकवाड सीएसकेचा नवा कर्णधार असेल". 

नाश्ता करताना धोनीने केली घोषणा

पण धोनीने ऋतुराज गायकवाडला ज्या पद्धतीने कर्णधारपद दिले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक, गुरुवारी सकाळी चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि मॅनेजमेंटमधील अधिकारी नाश्ता करत होते, त्यावेळी धोनीने ऋतुराज गायकवाड आपला पुढचा कर्णधार असेल, याची घोषणा केली. यानंतर तेथे उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.

सोशल मीडियावरही तुफान चर्चा

ऋतुराज गायकवाड सीएसकेचा नवा कर्णधार असेल, अशी घोषणा होताच सोशल मीडियाचे वातावरण गरम झाले आणि विविध चर्चांना सुरुवात झाली. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन सीएसेकच्या या निर्णयाबाबत म्हणाले की, ऋतुराज गायकवाडला गेल्या दोन वर्षांपासून कर्णधार म्हणून तयार केले जात आहे.'

दरम्यान, आयपीएल २०२२ च्या आधी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला संघाचा कर्णधार बनवले होते, परंतु तो निर्णय योग्य ठरला नाही, त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने पुन्हा नेतृत्व स्वीकारले.

ऋतुराज गायकवाडचे क्रिकेट करिअर

ऋतुराज गायकवाडच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १३५.५२ च्या स्ट्राइक रेट आणि ३९.०७  च्या सरासरीने १७९७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १ शतक आहे. याशिवाय १४ अर्धशतके आहेत. 

याशिवाय ऋतुराज गायकवाडने भारतासाठी ६ एकदिवसीय आणि १९ टी-20 सामने खेळले आहेत.

IPL_Entry_Point