MS Dhoni pats Vignesh Puthur : आयपीएल २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने १९.१ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
या सामन्यातून विघ्नेश पुथूर याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले. विघ्नेश पुथूरने पदार्पणात शानदार गोलंदाजी केली. या युवा गोलंदाजाने४ षटकात ३२ धावा देऊन ३ बळी घेतले, मात्र रचिन रवींद्रच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने सामना जिंकला.
२३ वर्षांच्या विघ्नेश पुथूर याने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी महेंद्रसिंह धोनीने सामना संपल्यानंतर विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप दिली.
आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर माही विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला, हे समोर आले नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने २५ चेंडूत सर्वाधिक ३१ धावा केल्या. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत २९ धावा केल्या.
तर दीपक चहरने १५ चेंडूत २८ धावा करत चांगली खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून नूर अहमदने सर्वाधिक ४ बळी घेतले. खलील अहमदला ३ विकेट मिळाले. नॅथन एलिस आणि रवी अश्विनने १-१ फलंदाज बाद केले.
मुंबई इंडियन्सच्या १५५ धावांना प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जने १९.१ षटकांत ६ गडी राखून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जसाठी रचिन रवींद्रने ४५ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूत ५३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून विघ्नेश पुथूर याने सर्वाधिक ३ बळी घेतले. दीपक चहर आणि विल जॅक यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
संबंधित बातम्या