MS Dhoni : धोनीच्या नावानं ७ रुपयांचं नाणं बाजारात येणार! खरं की काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनीच्या नावानं ७ रुपयांचं नाणं बाजारात येणार! खरं की काय? जाणून घ्या

MS Dhoni : धोनीच्या नावानं ७ रुपयांचं नाणं बाजारात येणार! खरं की काय? जाणून घ्या

Nov 18, 2024 12:19 PM IST

MS Dhoni News In Marathi : अलीकडेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धोनीच्या नावाने ७ रुपयांचे नाणे जारी करणार असल्याचे सांगण्यात येते आहे. ही पोस्ट पाहून चाहते खूप खूश झाले. पण आता ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MS Dhoni : धोनीच्या नावाने ७ रुपयांचे नाणे जारी होणार! खरं काय? जाणून घ्या
MS Dhoni : धोनीच्या नावाने ७ रुपयांचे नाणे जारी होणार! खरं काय? जाणून घ्या

सीएसेकचा विकेटकीपर फलंदाज एम एस धोनीबद्दल एक अफवा पसरली आहे. आणि धोनीबाबतच्या या अफवेने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली होती. पण आता याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

वास्तविक, या अफवेत असे सांगण्यात येत होते, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धोनीच्या नावाने ७ रुपयांचे नाणे जारी करणार आहे. धोनीचा सन्मान करण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. धोनीमुळे सात हा क्रमांक खूप लोकप्रिय झाला आहे.

सात हा धोनीचा जर्सी क्रमांक आहे. अशा स्थितीत सात रूपयांचे नाणे बाजारात येणार असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. मात्र, आता ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वास्तिवक, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनीच्या नावाने ७ नंबरचे नाणे आहे. जेव्हा हे पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि ही अफवा असल्याचे सांगितले. पीआयबीने आपल्या एक्स हँडलद्वारे ही माहिती दिली आहे.

पीआयबीने म्हटले आहे की, आर्थिक व्यवहार मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

धोनी भारताकडून खेळला तेव्हाही तो सात नंबरची जर्सी घालायचा. आयपीएलमध्येही तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सात नंबरची जर्सी घालतो.

दरम्यान, धोनीबद्दल दरवर्षी असे म्हटले जाते, की हे त्याचे शेवटचे आयपीएल असेल. आयपीएल २०२४ नंतरही असेच बोलले जात होते पण चेन्नईने पुढील हंगामासाठी जाहीर केलेल्या रिटेन खेळाडूंच्या यादीत धोनीचे नाव आहे.

म्हणजेच यावेळीही धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र, यावेळी चेन्नईने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. धोनीचे चाहते आयपीएलची वाट पाहतात जेणेकरून त्यांना त्यांचा आवडता खेळाडू पाहता येईल. धोनीची फॅन फॉलोइंग कमालीची आहे आणि ती आयपीएलदरम्यान स्पष्टपणे पाहायला मिळते.

Whats_app_banner