भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंह धोनी याचा आज (७ जुलै) ४३ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात आणि एक दिवस आधीपासूनच सेलिब्रेट करायला सुरू करताते. धोनीच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंहे धोनीच्या फॅन फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आयपीएलमध्ये धोनीची क्रेझ खूप जास्त असते. मैदानाबाहेरही तो कुठेही दिसला तरी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडे होतात. धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. टीम इंडियातील आणि आयपीएलमधील सहकारी खेळाडूंपासून ते जगभरातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. IPL च्या पहिल्या लिलावात धोनीला CSK ने जवळपास ६ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. CSK ने पाच वेळा (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३) IPL चे विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने CSK साठी दोन ट्रॉफी जिंकल्या.
धोनीने ३५० दिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्याने १० हजार ७७३ धावा ठोकल्या आहेत. यात १० शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, धोनी यादरम्यान ८२६ चौकार तर २२९ षटकारही ठोकले आहेत. सोबतच विकेटकीपर म्हणून त्याने ३२१ झेल आणि १२३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
धोनी ९० कसोटी सामने खेळले आहेत, त्यात त्याने ४८७६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. कसोटीत धोनीने ६ शतके तर ३३ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच, विकेटकीपर म्हणून २५६ कॅच आणि ३८ यष्टीचीत केले आहेत.
धोनीने ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने १६१७ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ५६ इतकी आहे. या दरम्यान माहीने ११६ चौकार आणि ५२ षटकार ठोकले आहेत. तर विकेटकिपींगमध्ये ५७ झेल आणि ३४ यष्टिचीत केले आहेत.
संबंधित बातम्या