मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  धोनी, विराट, सचिनला विसरा, भारताची ही क्रिकेटपटू २२५ एकरच्या राजवाड्यात राहते, किंमत किती? पाहा

धोनी, विराट, सचिनला विसरा, भारताची ही क्रिकेटपटू २२५ एकरच्या राजवाड्यात राहते, किंमत किती? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 30, 2023 10:06 PM IST

Saurashtra Women Cricketer Mridula Jadeja : भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत खेळाडू गुजरातची एक महिला क्रिकेटर आहे. या महिला क्रिकेटरचे नाव मृदुला कुमारी जडेजा आहे.

who is Mridula Jadeja
who is Mridula Jadeja

भारतीय क्रिकेटमध्ये महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठा फरक आहे. महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंना मॅच फी समान मिळते. पण वार्षिक पगारात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे जेव्हा श्रीमंत क्रिकेटपटूंची चर्चा केली जाते, तेव्हा पुरूष क्रिकेटपटूंचीच नावे समोर येतात.

सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडू आहेत. या खेळाडूंकडे अनेक चकचकीत कार, भव्य फार्महाऊस, आलिशान बंगले, महागडे फ्लॅट अशी संपत्ती असून त्यांची लक्झरी लाइफ स्टाइल पाहण्यासारखी आहे. 

भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

पण भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू पुरूष नसून एक महिला क्रिकेटपटू आहे, हे सांगितल्यावर आश्चर्य वाटेल. हे खरं वाटणार नाही. अनेक चाहत्यांना वाटते की, विराट कोहली, धोनी आणि सचिन हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत खेळाडू आहेत. पण हे खरे नाही.

कारण भारतीय क्रिकेटची सर्वात श्रीमंत खेळाडू गुजरातची एक महिला क्रिकेटर आहे. या महिला क्रिकेटरचे नाव मृदुला कुमारी जडेजा आहे.

२२५ एकरात घर

मृदुला कुमारी जडेजा सर्वात महागड्या घरात राहते. मृदुला कुमारी जडेजा राजकोटमधील रणजीत विलास पॅलेस याठिकाणी राहते. जडेजा हे नाव ऐकल्यावर गोंधळून जाऊ नका कारण मृदुला आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा कोणताही संबंध नाही. 

वास्तविक, मृदुला कुमारी जडेजा राजकोटच्या राजघराण्यातील आहे. २२५ एकरात रणजित विलास पॅलेस आहे. या पॅलेसचे सध्याचे मालक मंधातासिंह जडेजा हे मुदुलाचे वडील आहेत आणि ते राजकोटच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. रणजीत विलास पॅलेसमध्ये १५० खोल्या आहेत.

सोबतच यात अनेक विंटेज लक्झरी कारसह एक अनमोल गॅरेज देखील आहे. हा राजवाडा भारतातील काही राजवाड्यांपैकीच एक आहे, ज्यामध्ये पूर्वीच्या राजघराण्यातील लोक अजूनही राहत आहेत आणि या राजवाड्याचे रूपांत हेरिटेज हॉटेलमध्ये झालेले नाही.

रणजित विलास पॅलेस ४५०० कोटींचे 

मृदुला जडेजा तिच्या मोठ्या शाही निवासस्थानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या राजवाड्यात भारतातील सर्वात महागड्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रणजित विलास पॅलेसची किंमत अंदाजे ४५०० कोटी रुपये आहे. या पॅलेसमध्ये लेक फार्म, चांदीचा रथ, दागिने आणि अनेक विंटेज वाहने आहेत.

मृदुला जडेजा उजव्या हाताची फलंदाज 

मृदुलाने सौराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. मृदुलाने महिला आणि पुरूष क्रिकेटपूटंना समान मॅच फी मिळावी, यासाठी आवाज उठवला होता. मृदुलाने सौराष्ट्र आणि पश्चिम विभागाकडून क्रिकेट खेळले आहे.

तिने आपल्या कारकिर्दीत ४६ मर्यादित षटकांचे सामने खेळले आहेत. ३२ वर्षीय मृदुला जडेजा उजव्या हाताची फलंदाज आणि मध्यम वेगवान गोलंदाज आहे. तिने २०२१ मध्ये महिला वरिष्ठ वनडे ट्रॉफीमध्ये ४ अर्धशतके झळकावली होती.

रोहित-विराटच्या घरांची किंमत

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील एका ५३ मजली टॉवरमधील २९व्या मजल्यावर राहतो. या अलिशान अपार्टमेंटची किंमत ३० कोटी रुपये आहे. विराट कोहली आणि त्याची बॉलिवूड स्टार पत्नी अनुष्का शर्मा यांच्याकडे गुरुग्राममध्ये ८० कोटी रुपयांचा व्हिला आहे. 

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मुंबईतील वांद्रे येथे ८० कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतो. तर धोनी झारखंडमध्ये ७ एकरात पसरलेल्या फार्म हाउसमध्ये राहतो. या फार्म हाउसची सध्याची किंमत १० कोटी रूपये आहे. 

WhatsApp channel