IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आयपीएल २०२४ च्या पुढील दोन सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली. यावर्षी आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत आलेला मयांक गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात केवळ एक षटक टाकून मैदानाबाहेर गेला. मयांक यादवच्या पोटात दुखत असल्याने तो पुढील दोन सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे.
लँगर म्हणाले की, मयांक दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात खेळणार नाही, हे निश्चित आहे आणि ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या दोन दिवसांत होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध होण्याची शक्यता फार कमी आहे. दरम्यान, १९ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी मयांकला संघात परतण्याची शक्यता आहे. त्याने प्रत्येक सामना खेळावा अशी आमची इच्छा आहे, असे लँगर यांनी लखनौ येथे घेतलेल्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
लखनौच्या संघात मयांक यादव पुनरागमन करेल, असे अनेकांना वाटत आहे. पुढच्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी तो पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. परंतु, उद्याच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता फार कमी आहे. लँगर म्हणाले की, मयंकच्या दुखापतीवर एमआरआय करण्यात आला, ज्यात त्याच्या पोटात दुखात असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या सामन्यात त्याला वेदना होत होत्या, अशीही माहिती लँगर यांनी दिली आहे.
"डॉक्टर आणि फिजिओच्या माध्यमातून सर्व काही अगदी ठीक वाटत होते त्याने पहिले षटक गुजरात टायटन्सविरुद्ध टाकले आणि त्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. त्यानंतर एमआरआय स्कॅन करण्यात आला, ज्यात त्याच्या पोटात सूज आल्याची माहिती समोर आली. दुखापतीमुळे संघाच्या शेवटच्या दोन सामन्यांना मुकलेल्या डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान फिटनेसबाबत माहिती मिळाली. मोहसिन खान आणि मयांक यादव लखनौच्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. मोहसिन खान उद्याच्या सामन्यात उपलब्ध असेल, अशी शक्यता आहे.
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ, दीपक हुडा, अमित मिश्रा, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, कृष्णप्पा गौथम, मॅट हेन्री, प्रेरक मंकड, मोहसीन खान, शमर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी.
संबंधित बातम्या