मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी, शाहरूख-रणवीर मागे पडले, विराटची ब्रँड व्हॅल्यू किती? पाहा

कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी, शाहरूख-रणवीर मागे पडले, विराटची ब्रँड व्हॅल्यू किती? पाहा

Jun 18, 2024 07:19 PM IST

Virat Kohli Brand Value : सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशनच्या रिपोर्टनुसार, विराट कोहली भारताचा सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी बनला आहे. किंग कोहलीने याबाबतीत रणवीर सिंग आणि शाहरुख खान यांना मागे टाकले आहे.

कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी, शाहरूख-रणवीर मागे पडले, विराटची ब्रँड व्हॅल्यू किती? पाहा
कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी, शाहरूख-रणवीर मागे पडले, विराटची ब्रँड व्हॅल्यू किती? पाहा (ANI)

Most Valuable Celebrities Of India : विराट कोहली चाहत्यांचा प्रचंड लाडका आहे. विराटचे भारतासह जगभरात चाहते निर्माण झाले आहेत. विराट कोहलीची गणना सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये केली जाते. त्याचवेळी, आता विराट कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

विराट कोहलीने शाहरुख खान, सलमान खान आणि रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. खरंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटी असो की क्रिकेटर, विराट कोहलीने सगळ्यांना मागे टाकलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू १९०१ कोटी रुपये झाली आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू १६९३ कोटी रुपये आहे. याशिवाय शाहरुख खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू १००१ कोटी रुपये आहे.

वास्तविक, विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जवळपास २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विराट कोहली सध्या वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कप खेळत आहे.

टी-20 विश्वचषकात विराट कोहली आतापर्यंत फ्लॉप

भारतीय संघ सुपर-८ फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे विराट कोहली लवकरच आपल्या जुन्या शैलीत परतेल अशी आशा टीम इंडियाच्या चाहत्यांना असेल. आतापर्यंत विराट कोहली तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे.

पाकिस्तानविरुद्ध ४ धावा, तर आयर्लंडविरुद्ध १ धाव काढता आली. त्याचवेळी अमेरिकेविरुद्ध खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.

WhatsApp channel