मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आशिया चषकात शुभमन गिलनं पाडला धावांचा पाऊस; रोहित-विराटची एकूण कामगिरी कशी?

आशिया चषकात शुभमन गिलनं पाडला धावांचा पाऊस; रोहित-विराटची एकूण कामगिरी कशी?

Sep 17, 2023 08:15 PM IST

Most Runs In Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेत शुभमन गिलने जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे.

Shubman Gill Record
Shubman Gill Record

Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात मोहम्मद सिराजने २१ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. याशिवाय, भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. यंदाच्या स्पर्धेत ३०० धावांचा टप्पा ओलांडणारा शुभमन गिल एकमेव फलंदाज आहे.

आशिया चषक २०२३ स्पर्धेत शुभमन गिल सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरला आहे. त्याने ६ सामन्यात ७५.५० सरासरीने ३२० धावा केल्या. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध सुपर- ४ सामन्यात १२१ धावांची तुफानी खेळी केली होती. परंतु, या सामन्यात भारताला अवघ्या ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

यंदाच्या स्पर्धेत गिलनंतर श्रीलंकेचा कुशल मेंडीस सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. त्याने ६ सामन्यात २७९ धावा कुटल्या. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानंतर या यादीत श्रीलंकेचा सदीरा समरविक्रमा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याच्या नावावर २१५ धावांची नोंद आहे. पाकिस्तानचा बाबर आझम २०७ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. नेपाळविरुद्ध साखळी सामन्यात बाबरने १५१ धावांची खेळी केली होती. परंतु, त्यानंतर त्याला काही खास कामगिरी करता आली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

आशिया चषक २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माने ६ सामन्यात १९४ धावा केल्या. तर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत १७व्या क्रमांकावर आहे. विराटने ५ सामन्यात १२९ धावा केल्या. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने १२२ धावांची नाबाद खेळी केली होती.

|#+|

आशिया चषक २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा-

१) शुभमन गिल (भारत)- ३०२ धावा

२) कुशल मेंडिस (श्रीलंका)- २७० धावा

३) सदीरा समरविक्रमा (श्रीलंका)- २१५ धावा

४) बाबर आझम (पाकिस्तान)- २०७ धावा

५) मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- १९५ धावा

६) रोहित शर्मा (भारत)- १९४ धावा

७) नजमुल शांतो- (बांगलादेश)- १९३ धावा

८) इफ्तिखार अहमद (पाकिस्तान)- १७९ धावा

९) चरिथ असलंका (श्रीलंका)- १७९ धावा

१०) शाकीब अल हसन (बांगलादेश)- १७३

WhatsApp channel
विभाग