Most Powerful Indians : भारतीय क्रिकेटमध्ये जय शाह सर्वात जास्त पॉवरफुल, विराट-धोनीचा नंबर कितवा? पाहा-most powerful indians 2024 virat kohli jay shah most powerful indians irom cricket sports in 2024 ms dhoni neeraj chopra ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Most Powerful Indians : भारतीय क्रिकेटमध्ये जय शाह सर्वात जास्त पॉवरफुल, विराट-धोनीचा नंबर कितवा? पाहा

Most Powerful Indians : भारतीय क्रिकेटमध्ये जय शाह सर्वात जास्त पॉवरफुल, विराट-धोनीचा नंबर कितवा? पाहा

Feb 29, 2024 02:40 PM IST

most powerful indians 2024 : एका वृत्तपत्राने पॉवरफुल इंडियन्स २०२४ च्या नावाने एक यादी जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

most powerful indians 2024
most powerful indians 2024

Virat Kohli Most Powerful Indians List : BCCI चे सचिव जय शाह हे भारतीय क्रिकेटमधील सध्याचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती ठरले आहेत. या बाबतीत त्यांनी विराट कोहली यालाही मागे टाकले आहे. वास्तविक, नुकतचा एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. या मध्ये भारतातील १०० पावरफुल व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या यादीत भारतीय क्रिकेटमध्ये जय शाह हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि नीरज चोप्रा यांचाही समावेश आहे.

वास्तविक, एका वृत्तपत्राने पॉवरफुल इंडियन्स २०२४ च्या नावाने एक यादी जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारतीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह हे अव्वल स्थानावर आहेत. 

एकूण यादीत जय शाह हे ३५व्या स्थानावर आहेत. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष देखील आहेत. 

तसेच, भारतीय क्रिकेटमद्ये जय शाह यांच्यानंतर किंग कोहलीचे नाव आहे. भारतातील सर्वात पावरफुल व्यक्तींच्या यादीत कोहली ३८व्या स्थानावर आहे. कोहली हा भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. इन्स्टाग्रामवर २६६ मिलियन्स लोक त्याला फॉलो करतात.

दरम्यान, जय शाह आणि विराट कोहली यांच्यानंतर क्रीडा जगतातील इतर खेळाडूंबाबत बोलायचे झाले तर या यादीत नीरज चोप्रादेकील आहे. नीरज चोप्रा एकूण यादीत ४६ व्या क्रमांकावर आहेत. नीरज चोप्राने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. नीरज चोप्रानंतर महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आले आहे. एकूण यादीत धोनी ५८व्या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो.

धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला गेल्या मोसमात चॅम्पियन बनवले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला चॅम्पियन बनवले आहे.