भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने न्यूझीलंडेविरुद्ध बंगळुरू कसोटीत दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमधील हे १८ वे अर्धशतक आहे. आतापर्यंत ऋषभ पंतने कसोटी सामन्यांच्या ६२ डावांमध्ये १८ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी सामन्यांच्या १४४ डावांमध्ये ३९ अर्धशतके झळकावली आहेत.
भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत महेंद्रसिंग धोनीनंतर फारुख इंजिनियर दुसऱ्या स्थानावर आहेत. फारुख इंजिनिय यांनी कसोटी सामन्यांच्या ८७ डावांमध्ये १८ अर्धशतके झळकावली. याशिवाय ऋषभ पंतने कसोटी सामन्यांच्या ६२ डावांमध्ये १८ अर्धशतके झळकावली आहेत.
अशा प्रकारे ऋषभ पंत फारुख इंजिनिअरच्या बरोबरीवर पोहोचला आहे. मात्र, ऋषभ पंतने फारुख इंजिनिअरपेक्षा कमी डाव खेळला आहे. यानंतर सय्यद किरमाणी यांचे नाव यादीत आहे. सय्यद किरमानी यांनी कसोटी सामन्यांच्या १२४ डावांमध्ये १४ अर्धशतके झळकावली.
यासोबतच ऋषभ पंतने एम एस धोनीचा एक विक्रम मोडला आहे. पंतने कसोटीत २५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. पंत हा कसोटीत सर्वात जलद २५०० धावा करणारा भारतीय विकेटकीपर फलंदाज बंनला आहे. पंतने ६२ डावांत २५०० धावा पूर्ण केल्या. तर धोनीला २५०० धावा करण्यासाठी ६९ डाव लागले.
बंगळुरू कसोटीत भारताने हे वृत्त लिहिपर्यंत३७६ धावा केल्या असून ऋषभ पंत ७४ तर सरफराज खान १३५ धावांवर खेळत आहेत. भारताकडे २० धावांची आघाडी झाली आहे.
संबंधित बातम्या