SA vs AFG : अफगाण फलंदाजाचं नशीबच खराब! क्रिकेटमधील सर्वात विचित्र रनआऊट, व्हिडीओ एकदाच पाहाच!-most bizarre run out in cricket afghanistan rahmat shah against south africa watch video sa vs afg highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs AFG : अफगाण फलंदाजाचं नशीबच खराब! क्रिकेटमधील सर्वात विचित्र रनआऊट, व्हिडीओ एकदाच पाहाच!

SA vs AFG : अफगाण फलंदाजाचं नशीबच खराब! क्रिकेटमधील सर्वात विचित्र रनआऊट, व्हिडीओ एकदाच पाहाच!

Sep 23, 2024 02:21 PM IST

Rahmat Shah Most Bizarre Run out : या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. याच दरम्यान एक विचित्र अपघात घडला, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ९व्या षटकात अफगाणिस्तानचा रहमत शाह विचित्र पद्धतीने धावबाद झाला.

Rahmat Shah was the first of three players to be run out in the third ODI.
Rahmat Shah was the first of three players to be run out in the third ODI. (Twitter)

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामनाही एकतर्फीच झाला. अफगाणिस्तानने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले होते, तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अप्रतिम खेळ दाखवत अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला.

दक्षिण आफ्रिकेने रविवारी (२२ सप्टेंबर) अफगाणिस्तानला १६९ धावांत ऑलआउट केले आणि त्यानंतर ३३ षटकांत १७० धावा करून सामना जिंकला.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. याच दरम्यान एक विचित्र अपघात घडला, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ९व्या षटकात अफगाणिस्तानचा रहमत शाह विचित्र पद्धतीने धावबाद झाला.

वास्तविक, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याने फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर रहमतुल्ला गुरबाजने गोलंदाजाच्या दिशेनेच शॉट खेळला. यानंतर एनगिडीने चपळाई दाखवत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

मात्र, येथे चेंडू त्याच्या हाताला स्पर्श करून रहमत शाहच्या खांद्यावर आदळला. रहमत शाह रन घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला होता, पण चेंडू एनगिडीच्या हातात येत असल्याचे पाहून तो परत क्रिजच्या दिशेने फिरला, पण चेंडू चेंडू रहमतच्या खांद्याला लागून स्टंपवर आदळला. अशा स्थितीत रहमत शाह याला धावबाद व्हावे लागले. तो ६ चेंडूत एक धाव काढून बाद झाला. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र रनआऊट आहे.

सामन्यात गुरबाजने ९४ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली, तर अल्लाह गझनफरने शेवटच्या १५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नकाबा पीटर आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

१६९ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ३३ षटकांत विजय मिळवला. त्याच्यासाठी एडन मार्करामने ६७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली, तर ट्रिस स्टब्सने ४२ चेंडूंत १ षटकार आणि एक चौकारासह नाबाद २६ धावा केल्या.

Whats_app_banner
विभाग