टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दिसला होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराजची कामगिरी काही खास नव्हती. त्याचवेळी भारतीय संघाला ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० असा पराभव स्वीकारावा लागला.
मात्र, आता मोहम्मद सिराज याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वास्तविक, मोहम्मद सिराजने आपल्या कुटुंबासाठी एक अप्रतिम आलिशान लँड रोव्हर खरेदी केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मोहम्मद सिराज त्याच्या लँड रोव्हरसमोर उभा असल्याचे दिसत असून गाडीसोबत पोझ देत आहे.
मोहम्मद सिराज काळ्या रंगाच्या लँड रोव्हरसोबत उभा असलेला दिसत आहे. याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाजाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
सिराजचा लँड रोव्हरसोबतचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या लक्झरी कारची किंमत २.५० कोटी रुपये आहे. भारतात लँड रोव्हर कारची किंमत ६८ लाख रुपयांपासून सुरू होते.
मोहम्मद सिराज याने २७ कसोटी सामन्यांसह ४४ एकदिवसीय आणि १६ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या वेगवान गोलंदाजाने कसोटी सामन्यांमध्ये २९.६९ च्या सरासरीने ७४ फलंदाजांना बाद केले आहे.
एकदिवसीय फॉर्मेटमध्ये, मोहम्मद सिराजने ५.१९ च्या इकॉनॉमी आणि २४.०६ च्या सरासरीने ७१ फलंदाजांना आपला बळी बनवले आहे.े
याशिवाय मोहम्मद सिराजने टी-20 सामन्यात ७.७९ इकॉनॉमी आणि ३२.२९ च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो. आरसीबी व्यतिरिक्त मोहम्मद सिराज सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे.