मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Siraj : मोहम्मद सिराज आग ओकतोय! ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर आफ्रिकेत दाखवला दम

Mohammed Siraj : मोहम्मद सिराज आग ओकतोय! ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर आफ्रिकेत दाखवला दम

Jan 04, 2024 09:32 PM IST

Mohammed Siraj Bowling vs South Africa : केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते.

mohammed siraj
mohammed siraj (AFP)

Mohammed Siraj Bowling Stats Records : भारताने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य होते, हे लक्ष्य भारताने सहज गाठले. या विजयासह भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते.

भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु केपटाऊनमध्ये भारताने एकही कसोटी जिंकलेली नव्हती. 

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर सिराजची आफ्रिकेत कमाल

दरम्यान, भारताच्या विजयाचा मोहम्मद सिराज ठरला. सिराजने पहिल्या डावात आफ्रिकेचे ६ फलंदाज बाद केले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळेच आफ्रिका पहिल्या डावात अवघ्या ५५ धावांत गारद झाली. सिराजने अवघ्या १५ धावा देत ६ विकेट घेतले.

विशेष म्हणजे, परदेशी भूमीवर अशी आग ओकण्याची सिराजची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या देशांमध्ये आपली जादू दाखवली आहे.

सिराजने याआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये एका डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याने या यादीत दक्षिण आफ्रिकन भूमीचाही समावेश केला आहे.  तर इंग्लंडच्या भूमीवर सिराजने दोनदा एका डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत.

सिराजची परदेशी पीचेसवर कमाल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध - १५ धावांत ६ विकेट (२०२३-२४)

वेस्ट इंडिजविरुद्ध ६० धावांत ५ विकेट (२०२३)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७३ धावांत ५ विकेट (२०२१)

इंग्लंडविरुद्ध ३२ धावांत ४ विकेट (२०२१)

इंग्लंडविरुद्ध ६६ धावांत ४ विकेट (२०२२)

 

WhatsApp channel