टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची तेलंगणा सरकारने यावर्षी डीएसपी पदावर नियुक्ती केली. सिराजची डीएसपी म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा या वर्षी जुलैमध्ये करण्यात आली होती, तर ऑक्टोबर महिन्यात सिराजची ज्वाइनिंग झाली.
भारत टी-20 विश्वचषक विजेता बनल्यानंतर तेलंगणा सरकारने सिराजला सरकारी नोकरी देण्यासोबतच ६०० स्क्वेअर फुटचा भूखंड देण्याचे वचन दिले होते.
डीएसपी झाल्यानंतर मोहम्मद सिराजचा वेतन श्रेणी ५८,८५० ते १,३७,५० रुपये आहे. पगारासोबतच त्याला वैद्यकीय, प्रवास आणि घरभाडे यासाठी वेगळे भत्ते मिळणार आहेत.
डीएसपी पदावर बसण्यासाठी ग्रॅज्युएशन पदवी असणे अनिवार्य आहे, मात्र सिराजने केवळ १२ वीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. या संदर्भात तेलंगणा सरकारने एक निवेदन जारी करून मोहम्मद सिराज याला सूट दिली आहे.
बीसीसीआयच्या २०२४ च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टनुसार, मोहम्मद सिराजचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये मानधन मिळते.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने त्याला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय हा भारतीय गोलंदाज जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
सिराजपूर्वी जोगिंदर शर्मा हाही डीएसपी पदावर कार्यरत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही पंजाबमध्ये डीएसपी राहिली आहे. दुसरीकडे, २०२२ राष्ट्रकुल क्रीडा आणि २०२३ आशियाई खेळांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर दीप्ती शर्माला यूपी पोलिसात डीएसपी पद मिळाले.
मोहम्मद सिराजबद्दल बोलायचे तर तो सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १-० ने आघाडीवर आहे.
संबंधित बातम्या