Mohammed Siraj : मोहम्मद सिराजनं तासाभरात घेतल्या ६ विकेट्स, आफ्रिकेचे ५० धावांच्या आत ८ फलंदाज तंबूत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Siraj : मोहम्मद सिराजनं तासाभरात घेतल्या ६ विकेट्स, आफ्रिकेचे ५० धावांच्या आत ८ फलंदाज तंबूत

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजनं तासाभरात घेतल्या ६ विकेट्स, आफ्रिकेचे ५० धावांच्या आत ८ फलंदाज तंबूत

Published Jan 03, 2024 03:17 PM IST

mohammed siraj bowling vs south africa : मोहम्मद सिराजने डीन एल्गर आणि एडन मार्कराम यांसारख्या फलंदाजांना आपली शिकार बनवले.

Mohammed Siraj
Mohammed Siraj (REUTERS)

mohammed siraj bowling vs south africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी (IND vs SA 2nd Test) सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

मात्र आतापर्यंत डीन एल्गरचा निर्णय सपशेल चुकीचा ठरलेला दिसत आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj In IND vs SA 2nd Test) आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. त्याने हे वृत्त लिहीपर्यंत ९ षटकात अवघ्या धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. तर आफ्रिकेची धावसंख्या १९ षटकात ४६ धावांत ७ गडी बाद अशी आहे.

मोहम्मद सिराजने डीन एल्गर आणि एडन मार्कराम यांसारख्या फलंदाजांना आपली शिकार बनवले. यानंतर टोनी डी झॉर्झीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

एडन मार्कराम १० चेंडूत २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने एडन मार्करामचा झेल पकडला. यानंतर आपली शेवटची कसोटी खेळणारा कर्णधार डीन एल्गर १५ चेंडूत ४ धावा काढून मोहम्मद सिराजचा बळी ठरला.  मोहम्मद सिराजने डीन एल्गरला बोल्ड केले. त्यानंतर सिराजने टोनी डी’झोर्झीला बाद केले. केएल राहुलने टोनी डी झॉर्झीचा झेल घेतला. 

यानंतर सिराजन डेव्हिड बेडिंगहॅम, मार्को यान्सेन आणि काइल वेरेन यांना तंबूत पाठवले आहे. तिघेही झेलबाद झाले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरे (यष्टीरक्षक), मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या