मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड, वर्ल्ड चॅम्पियनसाठी मुख्यमंत्र्यांनी उघडला खजिना

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड, वर्ल्ड चॅम्पियनसाठी मुख्यमंत्र्यांनी उघडला खजिना

Jul 09, 2024 07:13 PM IST

टी-20 वर्ल्ड चॅम्पियन मोहम्मद सिराज याने नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. सीएम रेड्डी यांनी सिराजसाठी सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड, वर्ल्ड चॅम्पियनसाठी मुख्यमंत्र्यांनी उघडला खजिना
Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड, वर्ल्ड चॅम्पियनसाठी मुख्यमंत्र्यांनी उघडला खजिना (PTI)

मोहम्मद सिराज हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकून भारतात परतलेल्या खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच सिराज याची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे.

खरे तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराज याची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच सिराजला सरकारी नोकरीचीही घोषणा करण्यात आली. हैदराबादमध्ये घर बांधण्यासाठी सिराजला जमीन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यावेळी सिराज याने मुख्यमंत्र्यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली.

सिराज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या बैठकीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा आहे. टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. आयपीएलच्या पहिल्या होम मॅचमध्ये सिराजने घातक गोलंदाजी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. सिराजच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती चमकदार आहे.

सिराजने भारतासाठी ४१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ६८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २७ कसोटी सामन्यात ७४ बळी घेतले आहेत. सिराजने भारतासाठी १३ टी-20 सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत.

 

WhatsApp channel