मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Test : सिराजचा खतरनाक स्पेल, श्रीनाथ, इशांत शर्माचे विक्रम मोडले, पाहा

IND vs SA Test : सिराजचा खतरनाक स्पेल, श्रीनाथ, इशांत शर्माचे विक्रम मोडले, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 03, 2024 05:17 PM IST

Mohammed Siraj Bowling vs south africa : मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात ५ बळी घेत इतिहास रचला आहे. वास्तविक, सिराज भारतासाठी सर्वात कमी धावा देऊन ५ विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Mohammed Siraj Bowling
Mohammed Siraj Bowling (PTI)

Mohammed Siraj Record stats : टीम इंडिया आज (३ जानेवारी) केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळत आहे. या सामन्यात आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत गारद झाला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने ९ षटकात १५ धावा देत ६ फलंदाजांना तंबूत पाठवले. 

मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात ५ बळी घेत इतिहास रचला आहे.  वास्तविक, सिराज भारतासाठी सर्वात कमी धावा देऊन ५ विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या नंबरवर जसप्रीत बुमराह आहे. जसप्रीत बुमराहने २०१९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध ७ धावांत ५ फलंदाज बाद केले होते.

आता मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. केपटाऊनमध्ये आज मोहम्मद सिराजने १५ धावांत ६ खेळाडू बाद केले. 

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यानंतर भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवागल श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१ धावांत ६ बळी घेतले होते. श्रीनाथने ही कामगिरी १९९६ मध्ये केली होती.

यानंतर इशांत शर्माचा नंबर आहे. इशांतने २०१९ साली बांगलादेशविरुद्ध २२ धावात ५ विकेट घेतले होते.

आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले

केपटाऊन कसोटीत मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ५५ ​​धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी २ विकेट मिळाले.

तर दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल वेरेनने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सलामीवीर एडन मार्कराम (२ ), डीन एल्गर (४) धावांवर बाद झाले. यानंतर टोनी डी जॉर्जी (२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (३), मार्को जॅयानसेन (००), केशव महाराज (१ धावा), कागिसो रबाडा (१ धावा), नांद्रे बर्गर (४) तंबूत परतले.

भारताला इतिहास रचण्याची संधी

भारतीय संघ आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने येथे खेळल्या गेलेल्या ६ पैकी ४ कसोटी गमावल्या आहेत, तर इतर दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताला आता इतिहास रचण्याची संधी आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi