मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Siraj : सिराजची इन्स्टा स्टोरी पाहिली का? वनडेचा नंबर वन बॉलर बनताच आली वडिलांची आठवण

Mohammed Siraj : सिराजची इन्स्टा स्टोरी पाहिली का? वनडेचा नंबर वन बॉलर बनताच आली वडिलांची आठवण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2023 10:31 AM IST

mohammed siraj instagram story : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ इंस्टाग्रामवर एक गोष्ट पोस्ट केली आहे. मोहम्मद सिराजची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

mohammed siraj instagram story
mohammed siraj instagram story (AP)

mohammed siraj number one in odi ranking : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया चषक फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध चमकदार गोलंदाजी केली होती. या वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाला सातव्यांदा आशिया कप चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये मोहम्मद सिराजने ७ षटकांत २१ धावा देत ६ फलंदाज बाद केले. या घातक गोलंदाजीनंतर श्रीलंकेचा संघ १५.२ षटकांत अवघ्या ५० धावांवर गारद झाला.

ट्रेंडिंग न्यूज

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यानंतरआता सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक स्टोरी पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मोहम्मद सिराजचे वडील आणि आई दिसत आहेत. दोघांच्या हातात एक फोटो आहे, या फोटोत सिराज भारतीय संघाच्या जर्सीत दिसत आहे. तसेच मोहम्मद सिराजने कॅप्शनमध्ये मिस यू पापा असे लिहिले आहे.

मोहम्मद सिराज सामनावीर

मोहम्मद सिराजच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवर सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल होत आहे. याआधी मोहम्मद सिराजला आशिया कप फायनलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघासमोर ५१ धावांचे लक्ष्य होते. यानंतर भारतीय संघाने ६.१ षटकात एकही विकेट न गमावता ५१ धावा करून विजेतेपद पटकावले. भारतीय चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर