Mohammed Siraj Marnus Labuschagne : मोहम्मद सिराज सध्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या डोळ्यात खूपत देत आहे. जेव्हा तो गोलंदाजी करायला येतो किंवा क्षेत्ररक्षण करायला सीमारेषेवर जातो, तेव्हात त्याला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
आता सिराज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे कारण तो मैदानाच्या मध्यभागी एक विचित्र प्रकार करताना दिसला आहे. वास्तविक, ही युक्ती काही वेळाने टीम इंडियासाठी कामी आली कारण मार्नस लॅबुशेन १२ धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज मार्नस लॅबुशेन याने पिंक बॉल कसोटीत चांगली फलंदाजी केली. मात्र, याशिवाय भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत त्याला मनासारखी कामगिरी करता आली नाही. पर्थ स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत तो अपयशी ठरला होता. आता ब्रिस्बेनमधील त्याच्या घरच्या मैदानावरही त्याची बॅट शांत राहिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॅबुशेनने ५५ चेंडूत केवळ १२ धावा केल्या.
लॅबुशेनला नितीश रेड्डीने बाद केले
नितीश रेड्डीने मार्नस लॅबुशेनला बाद केले. लॅबुशेनने ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला लागून स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्य हातात गेला.
याआधी मोहम्मद सिराजने मार्नस लॅबुशेनला खूप त्रास दिला. दोघांमध्ये बराच वेळ चुरस रंगली होती. लॅबुशेनकडे सिराजच्या चेंडूंना उत्तर नव्हते.
पण डावाच्या ३३व्या षटकात एक विचित्र प्रकार घडला. मार्नस लॅबुशेनने या ओव्हरचा दुसरा चेंडू सोडून दिला, त्यानंतर सिराज ऑस्ट्रेलियन फलंदाजाकडे पाहत पुढे आला. प्रत्युत्तरात लॅबुशेननेही त्याच्याकडे टक लावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण सिराजने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि स्टंपजवळ गेला. त्याने स्टंपवरील बेल्सची अदलाबदल केली. हे लॅबुशेनसह सर्वांनी पाहिले. यानंतर सिराज परत येताच लॅबुशेनने पुन्हा बेल्सची अदलाबदल केली आणि ती पूर्वीसारखीच ठेवली. सिराजविरुद्ध १९ चेंडूंत लॅबुशेनच्या बॅटने केवळ ३ धावा काढल्या.
ॲडलेड कसोटीतही मोहम्मद सिराज आणि मार्नस लाबुशेन यांनी वातावरण तापवले होते.
ब्रिस्बेन कसोटीत सिराजने ३३व्या षटकात बेल बदलण्याची युक्ती केली होती. यानंतर पुढच्याच षटकात म्हणजेच ३४व्या षटकात नितीश रेड्डी गोलंदाजी करायला आला. नितीश बराच वेळ स्टंपच्या लाईन गोलंदाजी करत होता. पण नंतर त्याने ३४व्या षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टंपबाहेर टाकला, यावर ड्राइव्ह मारण्याच्या नादात लॅबुशेनने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे झेल दिला.
संबंधित बातम्या