Siraj Fastest Ball : सिराजने टाकला १८१.६ च्या स्पीडनं चेंडू? शोएब अख्तरचा वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडला, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Siraj Fastest Ball : सिराजने टाकला १८१.६ च्या स्पीडनं चेंडू? शोएब अख्तरचा वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडला, जाणून घ्या

Siraj Fastest Ball : सिराजने टाकला १८१.६ च्या स्पीडनं चेंडू? शोएब अख्तरचा वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडला, जाणून घ्या

Dec 06, 2024 08:31 PM IST

Mohammed Siraj Bowling Speed : मोहम्मद सिराजने ॲडलेड कसोटीत मोठी कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. पण या प्रकरणात कितपत तथ्य आहे माहीत आहे का?

DSP सिराजने टाकला १८१.६ च्या स्पीडनं चेंडू? शोएब अख्तरचा वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडला, जाणून घ्या
DSP सिराजने टाकला १८१.६ च्या स्पीडनं चेंडू? शोएब अख्तरचा वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडला, जाणून घ्या

Mohammed Siraj Fastest Ball IND vs AUS 2nd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मधील दुसरा कसोटी सामना ॲडलेड येथे आजपासून खेळला जात आहे. या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या १८० धावा करून ऑलआऊट झाली, त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गडी गमावून ८६ धावा करून सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

या दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज एका विचित्र कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. कारण याच सामन्यात त्याने क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा शोएब अख्तर याचा विक्रम मोडला. पण या प्रकरणात किती तथ्य आहे, ते जाणून घेऊया.

क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू टाकला होता. 

पण जेव्हा मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीत गोलंदाजी करत होता तेव्हा त्याच्या एका चेंडूचा वेग स्पीडोमीटरने ताशी १८१.६ किमी दाखवला. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

ही घटना ऑस्ट्रेलियन डावाच्या २४व्या षटकात घडली. पण हे सगळं स्पीडोमीटरमधील चुकीमुळे घडले.

विशेष म्हणजे, हे तेच षटक होते ज्यामध्ये सिराज चेंडू टाकणार होता, तेव्हा मार्नस लॅबुशॅने बाजूला झाला. खरंतर समोर एक फॅन बिअरचा ग्लास घेऊन उभा होता, त्यामुळे लॅबुशेनचं लक्ष तिकडे गेलं आणि तो बाजूला झाला. यामुळे सिराज चांगलाच रागावलेला दिसत होता. यावेळी सिराजने लॅबुशेनकडे पाहत त्याला खडसावले. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच सिराज याची तेलंगणा सरकारने या वर्षी डीएसपी पदावर नियुक्ती केली होती.

कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची स्थिती चांगली आहे. टीम इंडिया अवघ्या १८० रन्सवर ऑलआऊट झाली, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८६ धावा केल्या होत्या आणि अजूनही त्यांच्या ९ विकेट्स शिल्लक आहेत. सध्या कांगारू संघ पहिल्या डावात ९४ धावांनी मागे आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या