Mohammed Siraj Travis Head Fight : ॲडलेड कसोटी सामन्यादरम्यान मैदानावर एकमेकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांना आयसीसीने शिक्षा ठोठावली आहे. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली, पण तरीही आयसीसीने शिक्षा केली.
पण आयसीसीने ट्रॅव्हिस हेडवर कोणताही दंड ठोठावला नाही, त्याला सोडून दिले. मात्र, आयसीसीने सिराज आणि हेड दोघांना प्रत्येकी १-१ डिमेरिट पॉइंट दिला आहे.
आयसीसीने म्हटले की, 'सिराज आणि हेडला शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये १-१ डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे, कारण गेल्या २४ महिन्यांतील त्यांचा पहिला गुन्हा आहे.'
ॲडलेड कसोटीदरम्यान सिराज आणि हेड यांच्यात बाचाबाची झाली होती. हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला संतप्त होत पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला होता. प्रत्युत्तरात जात जात हेडनेही सिराजला शिवीगाळ केली.
आयसीसीने सिराजला आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफविरुद्ध अपशब्द वापरल्यास कारवाई केली जाते. तर हेड हा आचारसंहितेच्या कलम २.१३ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. त्यानुसार गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवर किंवा सपोर्ट स्टाफवर कारवाई केली जाते.
सिराज आणि हेड यांनी आपली चूक मान्य करत सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यासमोर आरोप मान्य केले आहेत. त्यामुळेच सुनावणीची गरज भासली नाही. अशा परिस्थितीत आयसीसीने दोघांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
सामन्यानंतर मोहम्मद सिराजचे या संपूर्ण प्रकरणाबाबतची प्रतिक्रियाही समोर आली होते. सिराजच्या म्हणण्यानुसार, हेडने पत्रकार परिषदेत जे सांगितले ते खरे नव्हते. स्टार स्पोर्ट्सवर हरभजन सिंगसोबत झालेल्या संवादात सिराज म्हणाला,
'मला त्याला गोलंदाजी करताना मजा येत होती. दोघांमध्ये खूप छान सामना चालू होता. चांगल्या चेंडूवरही जेव्हा षटकार मारला जातो तेव्हा आतून एक वेगळाच जोश येतो. त्याला बाद केल्यानंतर मी फक्त आनंद साजरा केला, मी काहीच बोललो नाही. पण त्याने उत्तर दिले.
सिराज पुढे म्हणाला, 'पीसीमध्ये को जे काही बोलला ते खोटे आहे. त्याने मला वेल बोल्ड म्हटले हे खोटे आहे. मी सर्वांचा आदर करतो. त्याची पद्धत चांगली नव्हती.
दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ट्रॅव्हिस हेडने सांगितले की, त्याने फक्त सिराजला वेल बोल्ड म्हटले होते. या प्रकरणाला फारसे महत्त्व द्यायचे नसल्याचेही हेड म्हणाला होता.
संबंधित बातम्या