Mohammed Shami : नाकात पाईप, हाताला बँडेज, मोहम्मद शमीला काय झालंय? जाणून घ्या-mohammed shami undergoes hill surgery shami shares photos on social media ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : नाकात पाईप, हाताला बँडेज, मोहम्मद शमीला काय झालंय? जाणून घ्या

Mohammed Shami : नाकात पाईप, हाताला बँडेज, मोहम्मद शमीला काय झालंय? जाणून घ्या

Feb 27, 2024 11:45 AM IST

Mohammed Shami : शमी सध्या युकेमध्ये असून सोमवारी (२६ फेब्रुवारी) तिथे त्याच्या टाचेची शस्त्रक्रिया झाली. विश्वचषक स्पर्धेपासून ही समस्या त्याला सतावत होती.

Mohammed Shami Surgery
Mohammed Shami Surgery

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शमीने हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत शमीच्या नाकात पाईप, हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे.

शमी सध्या युकेमध्ये असून सोमवारी (२६ फेब्रुवारी) तिथे त्याच्या टाचेची शस्त्रक्रिया झाली. विश्वचषक स्पर्धेपासून ही समस्या त्याला सतावत होती. नोव्हेंबरपासून स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर असलेल्या शमीने लवकरच आपला क्रिकेट प्रवास पुन्हा सुरू करण्याची आशा व्यक्त केली आहे.

'माझ्या पायावर परत येण्याची वाट पाहत आहे' असे त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

मोहम्मद शमी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला होता आणि तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. या काळात त्याला दक्षिण आफ्रिका दौरा, अफगाणिस्तानविरुद्धची मायदेशातील टी-20 मालिका आणि इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली ५ कसोटी सामन्यांची मालिका सोडावी लागली. आता तो इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) मधूनही बाहेर राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

तसेच, जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात तो खेळणार की नाही, हेदेखील निश्चित नाही.

 

गेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहम्मद शमीने सर्वाधिक २८ बळी घेत पर्पल कॅप जिंकली होती. यानंतर विश्वचषकातही त्याने धुमाकूळ घातला होता. हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर त्याला वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत शमीने अवघ्या सात सामन्यांत विक्रमी २४ बळी घेतले.

Whats_app_banner