Mohammed Shami : इज्जतच काढली की राव… संजय मांजरेकर यांच्या त्या वक्तव्यावर शमी खवळला, काय घडलं? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : इज्जतच काढली की राव… संजय मांजरेकर यांच्या त्या वक्तव्यावर शमी खवळला, काय घडलं? जाणून घ्या

Mohammed Shami : इज्जतच काढली की राव… संजय मांजरेकर यांच्या त्या वक्तव्यावर शमी खवळला, काय घडलं? जाणून घ्या

Nov 21, 2024 11:47 AM IST

Mohammed Shami On Sanjay Manjrekar : मोहम्मद शमीने संजय मांजरेकरांच्या आयपीएल मेगा लिलावातील भविष्यवाणीवर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे टीका केली आहे. शमीच्या दुखापतीमुळे त्याची किंमत कमी होऊ शकते असा मांजरेकरांचा दावा आहे, ज्यामुळे शमी नाराज झाला आहे.

मोहम्मद शमी
मोहम्मद शमी (Reuters/Instagram)

IPL Auction 2025 : मोहम्मद शमी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. दुखापतीमुळे शमी २०२४ चे आयपीएलही खेळू शकला नाही. शमी हा गुजरात टायटन्सचा भाग होता. आता तो २०२५ च्या मेगा लिलावासाठी मैदानात उतरणार आहे.

पण त्याआधीच मोहम्मद शमी टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि क्रिकेट एक्सपर्ट संजय मांजरेकर यांच्यावर चिडला आहे.

वास्तविक, संजय मांजरेकर यांनी शमीला लिलावात अपेक्षित किंमत मिळणार नाही, असे विधान केले होते. संजय मांजरेकर यांनी शमीची दुखापत लक्षात घेऊन हे वक्तव्य केले होते. यावर शमी म्हणाला की, लोकांनी भविष्य जाणून घेण्यासाठी संजय मांजरेकर सरांना भेटावे.

शमीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. मांजरेकरांचे भाकीत त्याने या स्टोरीवर लिहिले आहे, त्यानंतर याच्या खाली शमीने लिहिले, “जय हो बाबा. थोडेसे ज्ञान तुमच्या भविष्यासाठीही जतन करा, उपयोगी पडेल. कोणाला भविष्य जाणून घ्यायचे असेल तर सरांना भेटा.”

गुजरात टायटन्सने रिलीज केले

२०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरातने शमीचा आपल्या संघात समावेश केला होता. २०२२ मध्ये शमीने १६ सामन्यात २० विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर पुढच्या सत्रात म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये शमीने १७ सामन्यात २८ विकेट घेतल्या, तो मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. पण त्यानंतर दुखापतीमुळे शमी २०२४ चा हंगाम खेळू शकला नाही, त्यानंतर फ्रँचायझीने त्याला मेगा लिलावापूर्वी सोडले. यानंतर आता शमी २ कोटींच्या बेस प्राइससह आयपीएल मेगा लिलावात उतरणार आहे.

२०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर शमी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. याशिवाय दुखापतीमुळे तो आयपीएल २०२४ मध्ये खेळू शकला नाही. शमीने मात्र नुकतेच व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून तो बंगालकडून रणजी करंडक स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसला होता.

शमीने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर तो टीम इंडियात सामील होईल आणि ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या काही सामन्यांमध्येही तो खेळताना दिसू शकतो, असे मानले जात आहे.

मोहम्मद शमीची आयपीएल कारकीर्द

मोहम्मद शमीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११० आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ११० डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.

Whats_app_banner