रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत पश्चिम बंगालने मध्य प्रदेशचा ११ धावांनी पराभव केला. बंगालच्या या विजयात मोहम्मद शमीने महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने दोन्ही डावात एकूण ७ विकेट घेतल्या. आपल्या दमदार कामगिरीने शमीने भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी शमीची ही कामगिरी निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडेल.
सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२४/२५ मध्ये यशस्वी पुनरागमन केल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघात पुनरागमनाचे दरवाजे ठोठावत आहे. जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर शमीची रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीच्या सामन्यासाठी बंगाल संघात निवड झाली. यानंतर आता तो पूर्णपणे मॅच फिट असल्याचे दिसून आले आहे.
इंदूरमध्ये झालेल्या या सामन्यात शमीने ७ विकेट घेत बंगालला ११ धावांनी विजय मिळवून दिला. शमीने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने दुसऱ्या डावात रजत पाटीदार, अनुभव अग्रवाल आणि कुमार कार्तिकेय यांच्या विकेट घेतल्या.
शुभम शर्मा, व्यंकटेश अय्यर आणि सुभ्रांशु सेनापती यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मध्य प्रदेशचा संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करत होता, मात्र बंगालच्या गोलंदाजांनी वेळीच विकेट घेतल्या. बंगालकडून शाहबाज अहमदने ४ बळी घेतले, तर रोहित कुमारनेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने कार्तिकेयाला बाद करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
शमीने याआधी दुसऱ्या डावात फलंदाजी करत ३७ धावा केल्या होत्या. त्याने खालच्या फळीत दमदार खेळी करत बंगालला ३०० चा टप्पा पार करून दिला. त्याने अवघ्या ३६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार ठोकले.