Mohammed Shami Receive Arjuna Award: भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामीला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. नुकतीच केंद्र सरकारकडून या वर्षीसाठी क्रिडा पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शामीने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. ज्यामुळे त्याला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्र सरकारने २०२३ चे भारतीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. मोहम्मद शामीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना देशातील सर्वात मोठा पुरस्कार 'खेलरत्न' देण्यात आला.
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी यावर्षी बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारताचा झेंडा जगभर फडकवला होता. या जोडीने हँगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. दरम्यान, मोहम्मद शमीने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता. या दोन मोठ्या भारतीय क्रीडा पुरस्कारांसाठी तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्तीपासून पॅरा तिरंदाजी आणि अंध क्रिकेट या १९ विविध खेळांमधील एकूण २८ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१) चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
२) रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)
१) ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
२) अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
३) श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)
४) पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)
५) मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
६) आर वैशाली (बुद्धिबळ)
७) मोहम्मद शमी (क्रिकेट)
८) अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
९) दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
१०) दिक्षा डागर (गोल्फ)
११) कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
१२) पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
१३) पवन कुमार (कब्बडी)
१४) रितू नेगी (कब्बडी)
१५) नसरीन (खो-खो)
१६) सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
१७) ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
१८) सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
१९) हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
२०) अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
२१) सुनील कुमार (कुस्ती)
२२) सुश्री अँटिम (कुस्ती)
२३) नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
२४) शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
२५) इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
२६) प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)
१) ललित कुमार (कुस्ती)
२) आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
३) महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)
४) शिवेंद्र सिंग (हॉकी)
५) गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)