Bengal vs Chandigarh : बंगालनं शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला, शमीनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Bengal vs Chandigarh : बंगालनं शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला, शमीनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम

Bengal vs Chandigarh : बंगालनं शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला, शमीनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम

Dec 09, 2024 02:48 PM IST

Mohammed Shami, Bengal vs Chandigarh : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील एका रोमहर्षक लढतीत बंगालने चंदीगडचा ३ धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीने संघासाठी चमकदार कामगिरी केली. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही आपली ताकद दाखवली.

Bengal vs Chandigarh : बंगालनं अवघ्या ३ धावांनी सामना जिंकला, शमीनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम
Bengal vs Chandigarh : बंगालनं अवघ्या ३ धावांनी सामना जिंकला, शमीनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम (PTI)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या प्री क्वार्टर फायनलमध्ये बंगालने चंदीगडचा पराभव केला आहे. बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बंगालने ३ धावांनी थरारक विजय मिळवला. हा सामना अतिशय रोमांचक झाला. बंगालसाठी सायन घोषने शेवटचे षटक टाकले. त्याचे हे षटक गेम चेंजर ठरले.

बंगालकडून मोहम्मद शमीनेही चमकदार कामगिरी केली. फलंदाजीनंतर त्याने गोलंदाजीतही ताकद दाखवली.

प्रथम फलंदाजी करताना बंगालने १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात चंदीगड संघाला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १५६ धावा करता आल्या. त्यांच्याकडून राज बावाने सर्वाधिक ३२ धावा केल्या. २० चेंडूंचा सामना करताना त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. प्रदीप यादवने १९ चेंडूंचा सामना करत २७ धावा केल्या. कर्णधार मनन वोहराने २३ धावांची खेळी खेळली. अखेरीस संदीप शर्मा आणि निशंक बिर्ला नाबाद राहिले.

शेवटच्या षटकात चंदीगडला ११ करता आल्या नाहीत

चंदिगडला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. बंगालकडून हे षटक सायन घोषने टाकले. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव दिली. तिसरा चेंडू डॉट टाकला. चौथ्या चेंडूवर जगजीत सिंग धावबाद झाला. पण हा चेंडू वाईड बॉल देण्यात आला. यानंतर, पाचव्या चेंडूवर पुन्हा एक एक विकेटआली. निखिल शर्मा बाद झाला. शेवटच्या चेंडूवर चौकार आला.

बंगालसाठी शमीने चांगली फलंदाजी केली -

प्रथम फलंदाजी करताना बंगालने २० षटकांत १५९ धावा केल्या. यादरम्यान मोहम्मद शमीने संघासाठी दमदार कामगिरी केली. शमीने १७ चेंडूंचा सामना करत नाबाद ३२ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले.

बंगालकडून करण लालानेही चांगली खेळी केली. त्याच्या खेळीत २ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. हृतिक चॅटर्जीने १२ चेंडूत २८ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले.

शमीनं फलंदाजीनंतर गोलंदाजीत दाखवला दम

बंगालकडून शमीने नाबाद ३२ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्तम कौशल्य दाखवले. त्याने ४ षटकात केवळ २५ धावा देत १ बळी घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या