भारताचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील खेळणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये स्फोटक कामगिरी केल्यानंतर शमीला दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, पण त्याला पूर्णपणे बरे व्हायला एक वर्षाहून अधिक काळ लागला.
या काळात शमीने टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना कठोर परिश्रम घेतले.
शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये खेळून आपली फिटनेस सिद्ध केली. त्यामुळेच त्याचे टीम इंडियात पुनरागमन शक्य झाले. बंगालचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक शिब शंकर पॉल यांनी एका मुलाखतीत सांगितले की शमीने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी किती मेहनत घेतली.
स्पोर्ट्स बूमशी बोलताना शिब शंकर पॉल म्हणाला, 'शमी कमबॅक करण्यासाठी इतका आतुर होता की तो संघ येण्यापूर्वी ६ वाजता प्रशिक्षणासाठी मैदानावर पोहोचायचा. शमीला दुखापतीतून परतायला वेळ लागला, पण मी त्याच्यात भूक पाहिली आहे. सामना संपल्यानंतरही शमी गोलंदाजी करायचा. यावरून तो त्याच्या खेळासाठी किती समर्पित आहे हे दिसून येते.
यासोबतच शिब शंकर पॉल यांनी खुलासा केला, की शमीने दोन महिन्यांपासून त्याच्या आवडत्या पदार्थांना हात लावला नाही. फिटनेस परत मिळवण्यासाठी तो दिवसातून एकदाच जेवण करत असे.
‘शमीने काटेकोर डाएट प्लॅन फॉलो केला. मी पाहिले की तो दिवसातून एकदाच जेवत होता. त्याला बिर्याणी खूप आवडते, पण गेल्या दोन महिन्यांपासून मी त्याला त्याच्या आवडत्या पदार्थाला हात लावताना पाहिलेले नाही’.
संबंधित बातम्या