Mohammed Shami : मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडियाची तयारी सुरू
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडियाची तयारी सुरू

Mohammed Shami : मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडियाची तयारी सुरू

Nov 27, 2024 10:29 AM IST

Mohammed Shami IND vs AUS 2nd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही दिसणार नाही.

Mohammed Shami : मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? डे-नाईट टेस्टआधी नवी माहिती आली समोर
Mohammed Shami : मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? डे-नाईट टेस्टआधी नवी माहिती आली समोर (PTI)

टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत आहे. तर टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्याची तयारी करत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून डे नाईट खेळला जाणार आहे. या सामन्यातून मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण समोर आलेल्या माहितीनुसार, शमी दुसऱ्या कसोटीतही भारताचा भाग असणार नाही.

शमीने दोन आठवड्यांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध सामना खेळून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. याआधी दुखापतीमुळे तो जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर होता. तो परतताच शमीने धुमाकूळ घातला आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात ७ विकेट्स घेतल्या.

शमीबाबत टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल म्हणाले होते की, व्यवस्थापन त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. वृत्तानुसार, शमीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात येण्यास सांगण्यात आले नव्हते. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. शमीने मॅच फिटनेसवर काम करावे अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची इच्छा आहे.

टीम इंडियाने पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी खेळली होती. या सामन्यात टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा वेगवान गोलंदाज म्हणून दिसले. पहिल्या कसोटीत तिन्ही वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीनेही चांगले योगदान दिले.

 

Whats_app_banner