भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा नवा लूक समोर आला आहे. शमीच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने काही काळापूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केले होते, त्यानंतर त्याच्या केसांमध्ये एक वेगळीच चमक दिसून आली.
या दरम्यान, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानेही तिच्या सोशल मीडियाद्वारे एक सुंदर फोटो शेअर केला आहे. शमीचा लुक व्हायरल झाल्यानंतर लगेच सानियाने फोटो पोस्ट केला. यामुळे चाहत्यांनी सानिया आणि शमी दोघांची मजा घेतली आहे.
सानिया मिर्झाचा हा फोटो पाहून चाहते स्वत:ला थांबवू शकले नाहीत. फोटोमध्ये सानिया मिर्झा पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. सानिया मिर्झाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला मोहम्मद शमीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.
एका यूजरने गंमतीत लिहिले की, मोहम्मद शमीशी लग्न कर आता त्याला केसही आले आहेत. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, "शमी भाई सुद्धा सुंदर दिसत आहे, मॅडम, आता समजून घ्या."
अशा प्रकारे लोकांनी सानिया मिर्झाच्या पोस्टवर अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
सानिया मिर्झाने जानेवारीमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला होता. तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर मलिकने सानिया मिर्झाशी फारकत घेतली. तेव्हापासून मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता.
विशेष म्हणजे, शमीची पत्नी हसीन जहाँ ही देखील त्याच्यापासून वेगळी राहते. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नाच्या अफवांना उत आला होता. मात्र, शमीने या अफवांना पूर्णविराम देत त्या निराधार असल्याचे म्हटले होते.
शुभंकर मिश्रा याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना शमी म्हणाला, होता की हे विचित्र आहे. पण जेव्हा तुम्ही मोबाईल उघडता तेव्हा तुम्हाला तुमचेच फोटो दिसतात. मी सहमत आहे की मीम्स तुमच्या आनंदासाठी आहेत, परंतु ते कोणाला चिडवण्यासाठी वापरले जाऊ नयेत. हे मीम्स कोणाच्या तरी आयुष्याशी संबंधित आहेत. तुम्ही ते विचारपूर्वक बनवावे".