पर्थ कसोटीपूर्वीच टीम इंडिया अडचणीत आली आहे. भारताला २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. पण त्याआधी शुभमन गिल जायबंदी झाला आहे. तर रोहित शर्माही पर्थ कसोटीसाठी उपलब्ध नाही.
अशा स्थितीत ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वीच टीम इंडिया अडचणीत आली आहे.
मात्र, यादरम्यान देवदत्त पडिक्कल याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एका रिपोर्टनुसार तो टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. पडिक्कल आणि मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल मोठी माहिती मिळाली आहे.
मात्र शमीला टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सध्या शमीला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याच्या मूडमध्ये नाही.
पण देवदत्त पडिक्कल याच्याबाबत आनंदाची बातमी आली आहे. पडिक्कल सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. तो भारत अ संघाकडून खेळत आहे. पडिक्कलने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध पहिल्या डावात ३६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ८८ धावा केल्या. रिपोर्टनुसार, टीम इंडिया पडिक्कलला ऑस्ट्रेलियात थांबवू शकते. तर उर्वरित भारत अ संघ पुढील २४ तासांत भारतासाठी रवाना होऊ शकतो.
पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, १४ ते १८ डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.