IND vs ENG 2nd T20 : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली सुरुवात केली. भारताने पहिला सामना जिंकला. आता दुसरा टी-२० सामना शनिवारी (२५ जानेवारी) चेन्नईत होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.
टीम इंडिया मोहम्मद शमी याला पुनरागमनाची संधी देऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शमीची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. पण दुखापतीमुळे तो बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिला.
शमी टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्याने भारतासाठी आतापर्यंत २३ टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने २४ विकेट्स घेतल्या आहेत. शमीने १०१ एकदिवसीय सामन्यात १९५ विकेट घेतल्या आहेत.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. शमीला टी-20 साठी देखील संधी मिळाली जेणेकरून तो आगाऊ तयारी करू शकेल. पहिल्या सामन्याच्या अकरा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता. पण दुसऱ्या सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास रवी बिश्नोईला विश्रांती दिली जाऊ शकते. बिश्नोईने पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध ४ षटके टाकली होती. यात त्याने २२ धावा दिल्या. पण एकही विकेट घेऊ शकला नाही.
वरुण चक्रवर्तीने भारतासाठी घातक गोलंदाजी केली होती. त्याने ३ बळी घेतले होते. दुसऱ्या सामन्यातही वरुण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.
दुसऱ्या टी-20 साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटीकपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल/जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
संबंधित बातम्या