Mohammed Shami : ३२ वर्षांचा शमी २२ चा दिसणार, ऋषभ पंतच्या टोमण्यानंतर शमीने आपला लुकच बदलला, पाहा-mohammed shami got his hair transplanted rishabh pant comment video went viral asia cup 2023 india vs pakistan match ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : ३२ वर्षांचा शमी २२ चा दिसणार, ऋषभ पंतच्या टोमण्यानंतर शमीने आपला लुकच बदलला, पाहा

Mohammed Shami : ३२ वर्षांचा शमी २२ चा दिसणार, ऋषभ पंतच्या टोमण्यानंतर शमीने आपला लुकच बदलला, पाहा

Aug 30, 2023 05:35 PM IST

Mohammed Shami Hair Transplanted : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे हेअर ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे. त्याचा नवा लुक सध्या चर्चेत आहे.

Mohammed Shami Hair Transplant
Mohammed Shami Hair Transplant

Shami Hair Transplanted Rishabh Pant comment : आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. टीम इंडियाला टूर्नामेंटमधला पहिला सामना २ सप्टेंबरला खेळायचा आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही आशिया कपमधून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे.

मात्र, त्याच्या कमबॅक सामन्यात शमी त्याच्या नव्या लूकमध्ये दिसणार आहे. वास्तविक शमीला वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यात ब्रेक देण्यात आला होता. या वेळेत त्याने त्याच्या केसांवर उपचार केले आहेत.

शमीने केले हेअर ट्रान्सप्लांट

आशिया चषक २०२३ आधी मोहम्मद शमीने हेअर ट्रान्सप्लांट केले आहे. शमीचे केस वेगाने गळत होते. यामुळे त्याने हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, शमीचा हेअर ट्रान्सप्लांट लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केवळ त्याचा लूकच नाही तर ऋषभ पंतने २०२१ मध्ये केलेले एक ट्विटही चर्चेत आले आहे.

पंतने शमीची खिल्ली उडवली होती

टीमचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने २ वर्षांपूर्वी शमीच्या गळणाऱ्या केसांची खिल्ली उडवली होती. कदाचित आता शमीने पंतचे म्हणणे मनावर घेतले असेल आणि हेअर ट्रान्सप्लांट केले असेल.

शमीच्या वाढदिवशी पंतने ट्विटमध्ये लिहिले होते की, 'शमी भाई, केस आणि वय वेगाने निघून जात आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा.

यालर शमीनेही पंतला प्रत्युत्तर दिले आणि लिहिले होते, 'अपना टाईम आयेगा बेटा, केस आणि वय कोणीही थांबवू शकत नाही, पण लठ्ठपणावर उपचार आजही होतात.'

पंतचा हा टोमणा शमीला लागला असावा म्हणूनच त्याने हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतला, अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे.

शमीने मार्चमध्ये शेवटचा वनडे सामना खेळला

मोहम्मद शमी सध्या टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. यावेळी आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळवला जात आहे. त्याने या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. मात्र, यादरम्यान शमी टीम इंडियाकडून टेस्ट आणि टी-20 मध्ये सतत खेळताना दिसला. त्याच्या वनडेतील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ९० सामन्यांमध्ये १६२ विकेट घेतल्या आहेत.

Whats_app_banner