रंग बरसे..! मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने होळी खेळताना लगावले ठुमके, VIDEO तुफान व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रंग बरसे..! मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने होळी खेळताना लगावले ठुमके, VIDEO तुफान व्हायरल

रंग बरसे..! मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने होळी खेळताना लगावले ठुमके, VIDEO तुफान व्हायरल

Mar 26, 2024 11:52 PM IST

Hasin Jahan Viral Holi Video: होळी खेळताना हसीन जहाँने जोरदार डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने होळी खेळताना लगावले ठुमके
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने होळी खेळताना लगावले ठुमके

Hasin Jahan Viral Holi Video : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. होळी सेलेब्रेट करताना हसीन जहाँने जोरदार डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, रंग व पाण्याच्या उधळणीत हसीन जहाँ व अन्य दोन मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे.'जय-जय शिव शंकर, कांटा लगे न कंकड'  गाण्यावरील हसीनच्या डान्स मूव्स व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर हसीन जहाँचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्स यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हसीन जहाँचे इंस्टाग्रामवर जवळपास ३ लाख फॉलोअर्स आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक यूजर्स हसीन जहाँला सतत ट्रोल करत असतात.

हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर गंभीर आरोप -

मागील अनेक वर्षापासून भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ दरम्यान कोर्टात केस सुरू आहे. हसीन मुलीला घेऊन पतीपासून विभक्त राहते. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. त्याचबरोबर आपल्या सासरच्या लोकांवर बलात्काराचा प्रयत्न करणे, हुंड्यासाठी छळ आदि आरोप केले आहेत. दरम्यान मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमधून बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीवर सर्जरी झाली असून या सीझनमधून तो गुजरात टायटन्स संघाबाहेर आहे.

Whats_app_banner