India vs England 3rd T20 Rajkot : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, मोहम्मद शमी याचे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये पुनरागमन झाले.
अशाप्रकारे मोहम्मद शमी तब्बल १४ महिन्यांनंतर भारतीय संघात परतला. याआधी तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून मोहम्मद शमी टीम इंडियातून बाहेर होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सामना झाला होता.
अशाप्रकारे मोहम्मद शमी ४३६ दिवसांनंतर एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसला. याआधी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिसला होता. खरंतर मोहम्मद शमीवर २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपनंतर शस्त्रक्रिया करावी लागली होती.
मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल, असे मानले जात होते, पण तसे झाले नाही. त्याच वेळी, यानंतर, तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये प्लेइंग ११ चा भाग नव्हता.
१४ महिन्यानंतर शमीने आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात शमीची कामगिरी समाधानकारक राहिली. ३ षटकात गोलंदाजी करताना २५ धावा दिल्या. यात पुनरागमनाच्या सामन्यात शमीला एकही विकेट मिळाली नाही. पंरतू त्याने चांगल्या लयीत गोलंदाजी केली. शमीने चांगल्या लाईन लेथने चेंडू टाकले, ही टीम इंडियासाठी गुड न्यूज आहे.
शमीचे चेंडू स्विंग होत होते, तसेच, त्याने स्लोवर चेंडूंचाही अतिशय सुरेख पद्धतीने वापर केला.
शमीने या सामन्यात एक बीमर चेंडूही टाकला. शमीने इंग्लंडच्या डावातील १९व्या षटकात मार्क वुडला बीमर टाकला. हा चेंडू अंपायरने नो बॉल ठरवला.
राजकोट टी-20 मध्ये भारताला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट घेतल्या.
इंग्लंडकडून बेन डकेटने अर्धशतक झळकावले. त्याने २८ चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार मारले. लिव्हिंगस्टनने ४३ धावा केल्या. जोस बटलरने २४ धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले. त्याने ४ षटकात २४ धावा दिल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या आहेत. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी १-१ बळी घेतला.
संबंधित बातम्या