मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy 2024 : मोहम्मद शमीच्या भावाची तुफानी गोलंदाजी, उत्तर प्रदेशला ६० धावांत गारद केले

Ranji Trophy 2024 : मोहम्मद शमीच्या भावाची तुफानी गोलंदाजी, उत्तर प्रदेशला ६० धावांत गारद केले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 08:35 PM IST

Ranji Trophy 2024 : बंगालने मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. कैफ शमीसारखाच वेगवान गोलंदाज आहे.

mohammed kaif tooks 4 wickets VS up
mohammed kaif tooks 4 wickets VS up

Mohammed Kaif Uttar Pradesh vs Bengal : रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांच्यात आजपासून (१२ जानेवारी) सामना खेळला जात आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर असलेल्या या सामन्यात बंगालने मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. कैफ शमीसारखाच वेगवान गोलंदाज आहे.

या सामन्यात कैफने घातक गोलंदाजी करत ४ बळी घेतले. बंगालविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला उत्तर प्रदेशचा संघ अवघ्या ६० धावांवर गडगडला.

उत्तर प्रदेशचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या वेळी आर्यन जुयाल आणि समर्थ सिंग सलामीला आले. आर्यन ११ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. त्याला सिंधू जैस्वालने बाद केले. 

यानंतर मोहम्मद कैफने युपीची दुसरी विकेट काढली. कैफने समर्थ याला आपला बळी बनवले. समर्थने ४१ चेंडूंचा सामना करत १३ धावा केल्या. त्यानंतर कैफने सौरभ कुमार, भुवनेश्वर कुमार आणि अंकित राजपूतला बाद केले.

या सामन्यात कैफने ५.५ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. कैफ त्याच्या घातक गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. बंगालच्या याआधीच्या सामन्यात म्हणजेच आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याआधी कैफने ९ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १२ विकेट घेतल्या.

भुवनेश्वरकुमारचे ५ विकेट

यूपीनंतर बंगालचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी पहिल्या डावात ५ गडी गमावून ९५ धावा केल्या होत्या. सौरव पॉल १३ धावा करून बाद झाला. सुदीप कुमार शुन्यावर बाद झाला. कर्णधार मनोज तिवारी ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक पोरेल १२ धावा करून बाद झाला. युपीकडून एकट्या भुवनेश्वर कुमारने ५ विकेट घेतल्या.

WhatsApp channel